सांगली : महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत रस्त्याच्या कामाची फाईल गहाळ झाल्याच्या कारणावरून नगरसेवक महेंद्र सावंत यांनी अभियंत्यास शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. यावरुन सदस्यांकडून अधिकाºयांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या कारणावरून अधिकाºयांनीच सभात्याग केला. दरम्यान, सदस्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अधिकारी पुन्हा सभागृहात आले व त्यानंतर समितीची सभा पुन्हा सुरू झाली. अधिकाºयांच्याच सभात्यागामुळे सदस्यही काहीकाळ अवाक् झाले होते.
सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा शुक्रवारी झाली. सभेत सावंत यांनी रस्त्याच्या कामाची फाईल प्रलंबित असल्याबाबत विचारणा केली. अभियंता डी. डी. पवार यांनी, ही फाईल सावंत यांच्याकडेच दिल्याचे सांगितले. यावर आक्रमक होत सावंत यांनी, ‘विकास कामांच्या फाईली मी कशाला ठेवून घेऊ?’ असा सवाल केला. यापूर्वी झालेल्या सभेत याच फाईलीवर चर्चा झाली, तेव्हा अभियंता पवार यांनी फाईल गहाळ झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी सभापती सातपुते यांनी, फाईल गहाळ झाली असेल तर फौजदारी दाखल करा, असे आदेश दिले होते.
शुक्रवारी झालेल्या सभेत मात्र पवार यांनी, ही फाईल नगरसेवकांकडेच दिल्याचे सांगितले. फाईलवरून सावंत व पवार यांच्यात खडाजंगी झाली. आक्रमक झालेल्या सावंत यांनी पवार यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अधिकाºयांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सभागृहातून ‘वॉक आऊट’ केले.
अखेर नगरसेवक दिलीप पाटील यांनी अधिकाºयांशी चर्चा करून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अधिकाºयांनी सभागृहात प्रवेश केला व सभा झाली. यानंतर दिलीप पाटील यांनी, दरमान्यतेच्या फायली पेंडिंग कशासाठी ठेवल्या, असा सवाल केला. पण अधिकाºयांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पाटील यांनी सभापतींच्या आसनासमोर ठाण मांडले. अखेर सभापती सातपुते यांनी अधिकाºयांशी चर्चा करून येत्या आठवड्याभरात या फायली मंजूर होतील, असे स्पष्ट केले.कारवाईची मागणीशिवीगाळीच्या प्रकारानंतर अधिकाºयांनी स्थायी समिती सभापतींना निवेदन दिले. महिला सदस्य, महिला अधिकारी यांच्यासमक्ष अधिकाºयास सावंत यांनी अपशब्द वापरणे ही गंभीर बाब आहे. नियमानुसार सभेचे कामकाज नसल्याने आम्ही सभात्याग केला आहे. गैरवर्तणूक करणाºया सदस्यावर कारवाई करण्याची मागणी अधिकाºयांनी केली. उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर, डॉ. सुनील आंबोळे, अमर चव्हाण, नकुल जकाते, चंद्रकांत आडके आदी यावेळी उपस्थित होते.