शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

Sangli News: शिगावात वारणा नदीचे पाणी काळसर, परिसरात दुर्गंधी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By श्रीनिवास नागे | Published: February 06, 2023 6:18 PM

शुद्ध नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा नदीला सध्या गटारीचे स्वरूप

शिगाव (सांगली) : सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सुजलाम-सुफलाम करणाऱ्या व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत शुद्ध नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा नदीला सध्या गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिगाव (ता. वाळवा) येथील नदीपात्रात काळे पाणी आले असून, दुर्गंधी पसरली आहे.काही कारखान्यांची वारणा नदीत मळी सोडली असून त्यामुळे नदीचे पाणी काळसर बनल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिगावजवळ संपर्ण पात्र काळसर दिसत आहे. वारणेतील मळीचे पाणी पिल्याने अनेक नागरिक आजारी पडू लागले आहेत, तर अनेक जलचर मृत झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना पायबंद बसला पाहिजे व पाणी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, यासाठी निसर्गप्रेमी ग्रुप (पेठवडगाव) यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.निसर्गप्रेमी ग्रुपचे संदीप पाटील म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा गंभीर घटनेकडे प्रत्येकवेळी कानाडोळा करते. सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी शासन का खेळत आहे? जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागेल. संबंधित व्यक्ती अथवा कंपनीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार आहोत. दरम्यान, शिगावच्या ग्रामपंचायत प्रशासनाने नळाला येणारे पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

पाण्यात मळी सोडून हजारो लोकांच्या जिवाशी खेळण्याचे धाडस होतेच कसे, हा प्रश्न आहे. नागरिक आता पाणी प्रदूषणामुळे वैतागले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पावले उचलावीत.  - चंद्रकांत देसाई, नागरिक, शिगाव

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीpollutionप्रदूषण