सांगली : असंघटित कामगार कल्याण मंडळअंतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करून तात्काळ मंडळाचे कामकाज सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.
यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी, संघटनेच्या मागण्या शासनदरबारी मांडण्यात येतील, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.सांगलीत राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, राज्य संघटनेचे संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटक सचिन चोपडे, संघटक सुरेश कांबळे, दत्तात्रय सरगर, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाºयांकडे दिलेल्या निवेदनात, असंघटित कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तात्काळ सुरू करा, या सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा-सुविधा तात्काळ मिळाल्या पाहिजेत, मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करण्यात यावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठित करा, गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नयेत, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, शहरात नगरपालिका, महापालिकांच्या तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्यावतीने उभारण्यात येणारी व्यापारी संकुले, मिनी मार्केट अशा ठिकाणी वृत्तपत्रांच्या स्टॉलसाठी जागा आरक्षित ठेवण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अनिल रुपनर, कुपवाड अध्यक्ष देवानंद वसगडे, मिरज अध्यक्ष रामा कुंभार, सरचिटणीस विशाल रासनकर, सांगली शहरचे बजरंग यमगर, आर. एस. माने, समित मेहता, सांगली शहर उपाध्यक्ष कृष्णा जामदार, प्रताप दुधारे, राजू भगरे, मनोहर पाटील, प्रशांत साळुंखे, बंडू अष्टेकर, रणजित पाटील - मिरज , सुनील कदम, बाळू पाटील, वासंती विकास सूर्यवंशी, पद्मिनी प्रशांत जगताप, आक्काताई पोपट मंडले, अलका बाळू पाटील, गणेश कटगी, सुनील कट्याप्पा, संजय जेऊर- बेळंकी, सुशांत कुंभार -भिलवडी, संदीप माळी - खंडोबाचीवाडी, धनंजय सूर्यवंशी- पाचवा मैल, अनिकेत गंभीर - येळावी, चंद्रकांत जोशी- नागठाणे, तानाजी जाधव- चिंचणी, पोपट मंडले, दीपक रामाने, आर. एस. कदम, महेश पिसे, दत्तात्रय सरगर, अनिल रूपनर, राजाराम चिंदगे, महाालिंग वैरागे, मुन्ना मुल्ला, अमोल साबळे, विमल काळोखे, बंदेनवाज मुल्ला, सागर घोरपडे, रमेश साळुंखे, देवानंद वसगडे, सचिन चोपडे, जावेद शेख, इलियास शेख, गोरख सोरटे, महेश वैद्य, राजेश कुकळेकर, दिलीप सातपुते, अजय गावडे, राजेंद्र पोटे, दीपक वाघमारे, सौ. आशा सूर्यवंशी, प्रकाश उन्हाळे, रमेश उन्हाळे, दीपक सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जयकुमार संगमे, अरुण कदम, विजय गावडे, एन. टी. कोष्टी, श्रीकांत बोन्द्रे, मच्छिंद्र रासनकर, राजू कांबळे, कृष्णा संकपाळ, नंदकुमार पोवाडे, तेजस सूर्यवंशी, सुभाष जाधव, संदीप गवळी, स्वप्निल पाटील, सुशांत कुंभार, धनगाव, अमोल कोरे, जे. ए. पाटील, मिरज, रवी देसाई कसबे डिग्रज यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.अनेकांचा पाठिंबासांगलीत शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष खराडे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, दि पॉवर आॅफ मीडियाचे अध्यक्ष ईश्वर हुलवान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नाभिक महामंडळचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड, अनिल काशीद, शरद झेंडे, अशोक सूर्यवंशी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.