शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

सांगली : जिल्ह्यात बारावीचे एक, तर दहावीची पाच केंद्रे कुप्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:16 PM

सांगली जिल्ह्यात बारावीचे संख नंबर एक आणि दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर कॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व केंद्रे कुप्रसिध्द, तर बारावीचे शिराळा उपद्रवी आणि दहावीची पाच परीक्षा केंदे्र उपद्रवी म्हणून जाहीर केली आहेत.

ठळक मुद्देकॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने केले जाहीरकेंद्रांवर सात भरारी पथकांचे लक्ष परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन बंद

सांगली : जिल्ह्यात बारावीचे संख नंबर एक आणि दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर कॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व केंद्रे कुप्रसिध्द, तर बारावीचे शिराळा उपद्रवी आणि दहावीची पाच परीक्षा केंदे्र उपद्रवी म्हणून जाहीर केली आहेत. या केंद्रांवर सात भरारी पथकांचे लक्ष असणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन बंद ठेवण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.बारावीची लेखी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्चअखेर होणार आहे. बारावी परीक्षेसाठी ३६ हजार ८८५ विद्यार्थी संख्या असून, ४५ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. यापैकी शिराळा उपद्रवी आणि संख नंबर १ कुप्रसिध्द परीक्षा केंद्र म्हणून बोर्डाने जाहीर केले आहे.दहावीची परीक्षा दि. १ ते २४ मार्चअखेर होणार आहे. यासाठी ४३ हजार ८१९ विद्यार्थी असून, १०३ केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केली आहे. मिरज तालुक्यातील मालगाव, शिराळा तालुक्यातील शिराळा नंबर एक, वाळवा तालुक्यातील वाळवा, येलूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची अशी पाच उपद्रवी आणि मिरज तालुक्यातील एरंडोली, मिरज नंबर एक, वाळवा तालुक्यातील भवानीनगर, जत तालुक्यातील उमदी, तसेच कवठेमहांकाळ अशी पाच केंद्रे कुप्रसिध्द आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीeducationशैक्षणिक