शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सांगली : अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात संधी : डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:28 PM

मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

सांगली : मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतून आयएएस, आयपीएसप्रमाणेच इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसमध्ये करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. शिर्के म्हणाले, अर्थशास्त्र विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या विषयातील संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासगटांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. या विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. काही विषय असे असतात त्यावर जग चालते, त्या या विषयांचा समावेश आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात या विषयाला मागणी आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनालाही महत्त्व द्यावे.

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, संशोधन प्रकल्पासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाने यासाठी प्रस्ताव सादर करून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढविण्यास प्राधान्य द्यावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांतून आयएएस, आयपीएस होता येतेच, शिवाय अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आयईएस होऊन देशभरात सेवेची संधी मिळत आहे. विमाशास्त्रातही विद्यार्थ्यांना संधी वाढत आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपले करिअर समृध्द करावे. यावेळी ‘सुयेक’चे अध्यक्ष उल्हास माळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, मेधा भागवत, मंगल माळगे, बी. जी. कोरे, संतोष यादव, रोहिणी देशपांडे, सुभाष दगडे, पी. जे. ताम्हनकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.‘नेट’चा वापरसुध्दा ‘नेटा’नेच कराशिर्के म्हणाले, सध्या मोबाईलवर मिळत असलेल्या इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजनासाठी नको, तर अभ्यासासाठी करावा. नेटव्दारे अभ्यास केल्यास अधिक सोप्या पध्दतीने अभ्यास होतो. नेटचा वापर करून रोजच्या जगण्यातील अर्थशास्त्रही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे.सांगलीत सोमवारी अर्थशास्त्र परिषदेत डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. जी. कुलकर्णी, डॉ. जे. एफ. पाटील, मेधा भागवत उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEconomyअर्थव्यवस्था