शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस, प्रवासाचा खर्च घटणार; गाडीचे वेळापत्रक.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 5:37 PM

हळदीच्या बाजारपेठांना जाण्याचे मार्ग सोपे

सांगली : जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. याशिवाय राज्यातील व राज्याबाहेरील हळदीच्या बाजारपेठांना जाणेही या गाडीच्या माध्यमातून सुलभ होणार आहे.सांगलीची हळद बाजारपेठ जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथील शेतकरी सांगलीच्या बाजारपेठेतच येत असतात. सांगली येथे हळद पॉलिश करणे तसेच पावडर करण्याची प्रक्रियाही होते. दरवर्षी २५ ते ३० लाख क्विंटल हळद पावडर सांगलीतून विदेशात निर्यात होते. महाराष्ट्रात सांगली शिवाय नांदेड, हिंगोली, जालना, बसमत, औरंगाबाद येथे हळदीची शेती होते. निजामाबादच्या हळदीचीही ख्याती आहे. या सर्व हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गावांना, जिल्ह्यांना सांगलीशी जोडण्याचे काम सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस करीत आहे. परळी वैजनाथ येथून अनेक हळदीच्या बाजारपेठा जवळ आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना किंवा त्या भागातील शेतकऱ्यांना सांगलीला येणे या गाडीच्या माध्यमातून सोपे झाले आहे.

गाडीचे वेळापत्रक असे..

  • परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनहून रोज सकाळी सव्वा आठ वाजता गाडी (क्र. ११४११) सुटते. लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूरमार्गे ही गाडी सांगली स्थानकावर सायंकाळी ६:५० वाजता पोहोचते.
  • सांगली स्थानकातून रोज रात्री ८:३५ वाजता गाडी (क्र. ११४१२) सुटते. पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूरमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ला परळी वैजनाथला पोहोचते.
  • परळी वैजनाथ ते सांगलीदरम्यान ही गाडी २५ रेल्वे स्थानकावर थांबते.

परळी वैजनाथ स्थानकापासून कुठे किती अंतरनिजामाबाद : २०० कि. मी.बसमत : ११० कि. मी.नांदेड : १००औरंगाबाद : २००जालना : १६०हिंगोली : १६०परभणी : ६६बीड : ९१

कमी खर्चात प्रवासपरळी वैजनाथ ते सांगलीचे तिकीट फक्त १५० रुपये आहे. सांगली स्थानकापासून येथील हळद बाजारपेठेत हाकेच्या अंतरावर आहे. जर सांगली हळद बाजारातील काम तासाभरात आटोपले तर तो शेतकरी त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता सांगली स्थानकावरून परत जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील हळद व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांनी सांगली-परळी एक्स्प्रेस गाडीचा फायदा घ्यावा. जास्तीत जास्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी यातून प्रवास करावा. महाराष्ट्राच्या हळद बाजारपेठेच्या वृद्धीसाठी उपयुक्त सांगली-परळी रेल्वे गाडीला प्रोत्साहन द्यावे. - रोहित गोडबोले, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे