सांगली : महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
रोजगार हमी योजनेतून शौचालय मंजूर झालेले लाभार्थी उमेश कोळी यांच्या निवासस्थानी शौचालय पायाभरणी आणि पंडित सदाशिव कोळी या लाभार्थीच्या निवासस्थानी शोषखड्डे पायाभरणी करण्यात आली.
स्वच्छतेची सवय प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे, असे स्पष्ट करून डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कामेरी गाव 2016 साली हागणदारीमुक्त झाले आहे, ही चांगली बाब आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यापुढेही स्वच्छ भारत आणि स्वच्छ कामेरी कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता हीच सेवा या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागत व प्रास्ताविक करताना रणजीत पाटील यांनी कामेरी गावाची वैशिष्ट्ये व गावातील स्वच्छता मोहीम, गावाला मिळालेले विविध पुरस्कार, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती दिली. तसेच गावाची गोबरधन योजनेमध्ये निवड झाल्याची माहिती देऊन, आगामी नियोजन सांगितले. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी उपसरपंच तानाजी माने, नायब तहसीलदार सरस्वती पाटील, ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, पाणीपुरवठा व स्वच्छचा विभागाचे सचिन सावंत, गणेश म्हस्के आणि सुहास गवळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अभिलेख कक्ष, इ सेवा केंद्र आदिंची पाहणी केली. रोजगार हमी योजनेतून शौचालय मंजूर झालेले लाभार्थी उमेश कोळी यांच्या निवासस्थानी शौचालय पायाभरणी आणि पंडित सदाशिव कोळी या लाभार्थीच्या निवासस्थानी शोषखड्डे पायाभरणी करण्यात आली.
सामाजिक ऐक्य, शांतता अबाधित ठेवा, गणेशोत्सव, मोहरमचा आनंद द्विगुणित करावि. ना. काळमजिल्हाधिकारी, सांगली
आपण व्हॉटस् ॲप ग्रुपचे ॲडमिन आहात… तर अधिक सजग आणि जागृत रहा आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करू नका, असा मजकूर आल्यास पोलिसांना कळवा, ही आपली जबाबदारी आहे.सुहेल शर्माजिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली