शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

सांगली पोलीस झाले हायटेक; वाहनांना जीपीएस यंत्रणा, ७० ठिकाणी सीसीटीव्ही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 12:54 PM

अत्याधुनिक यंत्रणेमुळे गुन्हेगारीला आळा बसणार

सांगली : सांगली पोलीस दलाने आधुनिकतेची कास धरत हायटेक यंत्रणा उभारलीय. पोलीस दलातील वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून महापालिका हद्दीत ७० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवलं जाणाराय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते व पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्या उपस्थितीत मंगळवारी या दोन्ही यंत्रणांचं लोकार्पण करण्यात आले. पोलीस दलातील चारचाकी व दुचाकी अशा ८८ वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली. यामुळे या वाहनाचं लोकेशन, त्याचा वेग, वाहन कुठे थांबले आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणाराय. याशिवाय गुन्हा घडलेल्या ठिकाणी वाहन तातडीनं पाठवणं सोयीचं होणाराय. जीपीएस यंत्रणेमुळे व्हीआयपी, मंत्र्यांच्या दौऱ्यात वाहनांचं अचूक लोकेशन मिळेल. तसंच परजिल्ह्यात आरोपीला आणण्यासाठी गेलेल्या वाहनाची अचूक माहितीदेखील पोलिसांना मिळेल. जीपीएससोबतच महापालिका हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरेही मंगळवारी सुरू करण्यात आले. महापालिका हद्दीतील ३१ महत्वाच्या चौकात ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे वाहतुक नियंत्रणासोबतच जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल. व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चा, आंदोलनातील चालू घडामोडीची माहितीही पोलिसांना यामुळे मिळणार आहे. पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्हींची मोठी मदत होणाराय.  

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस