शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

 सांगलीत पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती; गुन्हेगारांची कुंडली तयार 

By शरद जाधव | Published: October 19, 2023 8:00 PM

गुन्हेगारांच्या कृत्यावर अंकुश रहावा यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

 सांगली: आगामी सण, उत्सवात गुन्हेगारांच्या कृत्यावर अंकुश रहावा यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलन आणि आदान प्रदान मोहिम राबविण्यात आली.

खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याने गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी अदययावत करण्यात आली. यावेळी सर्वांकडून एक माहिती भरून घेण्यात आली. त्यात सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजिवीकेची साधने काय आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कुठे व कोणासोबत राहण्यास आहे यासह मोबाइल क्रमांक, नातेवाइकांचेही मोबाइल क्रमांक घेण्यात आले.

रेकॉर्डवरील या गुन्हेगारांनी पुन्हा कोणताही गुन्हा करू नये तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभाग घेऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी कडक सुचना दिल्या. विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहातून जामीनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि बीट मार्शलनी वारंवार तपासणी करून ते सध्या काय करतात, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास व वारंवार गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास तडीपारीचा प्रस्ताव करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले. यावेळी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस