शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

सांगलीत घरफोडी गुन्हा दाखल : पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

By admin | Published: November 03, 2014 11:10 PM

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला

सांगली : विश्रामबागच्या मंगळवार बाजार परिसरातील गजानन कॉलनीतील तुषार बाबासाहेब बुटाले यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. आज (सोमवार) सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.गजानन कॉलनीतील ‘अविनाश’ अपार्टमेंटमध्ये बुटाले राहतात. शनिवारी दुपारी ते कुटुंबासह परगावी नातेवाईकांकडे गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी व कोयंडा कापून घरात प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमध्ये ठेवलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. जाताना चोरट्यांनी दरवाजा बाहेरुन लावून घेतला होता. यामुळे शेजाऱ्यांनाही चोरीचा हा प्रकार लक्षात आला नाही. सोमवारी सायंकाळी बुटाले कुटुंबीय परगावाहून परत आले असता, दरवाजाचा कडी व कोयंडा तोडल्याचे दिसून आले. ते घरात गेले असता, कपाटातील साहित्य विस्कटलेले व दागिने, रोकड नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बुटाले यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही चोरी स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेवून केली असावी, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. (प्रतिनिधी)पावत्या पळविल्याचोरट्यांनी दागिन्यांबरोबर दागिने खरेदीच्या पावत्याही पळविल्या आहेत. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. दागिन्यांमध्ये बांगड्या, चेन, अंगठीचा समावेश आहे.जाताना चोरट्यांनी दरवाजा बाहेरुन लावून घेतला होता. यामुळे शेजाऱ्यांनाही चोरीचा हा प्रकार लक्षात आला नाही.