शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

सांगली : शिक्षक बँकेत नियम डावलून नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:03 AM

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत आकृतिबंध डावलून सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. याविरोधात कोल्हापूर विभागीय निबंधकांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देपोपट सूर्यवंशी, हंबीरराव पवार : मनमानी कारभाराविरोधात लवकरच आंदोलन

सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत आकृतिबंध डावलून सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. याविरोधात कोल्हापूर विभागीय निबंधकांकडे तक्रार केली आहे. सत्ताधाºयांच्या मनमानी कारभार व बेकायदा नोकरभरतीविरोधात लवकरच बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते पोपटराव सूर्र्यवंशी व राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले की, बँकेची सत्ता समितीच्या हाती आल्यानंतर दहा कर्मचाºयांची भरती केली. आता छुप्या पद्धतीने १२ कर्मचारी भरले आहेत. बँकेचा कर्मचारी आकृतिबंध १६२ चा असून, तितके कर्मचारी कार्यरत आहेत. सभासद व संचालकांनाही अंधारात ठेवून नव्या लोकांची भरती केली जाते. साध्या वहीवर संबंधितांच्या सह्या केल्या जातात व तीन महिने पूर्ण होताच त्यांना गुपचूप आॅर्डर दिल्या जातात.

भरतीविरोधात कोणीही न्यायालयात जाऊ नये, यासाठी आॅर्डरच्या प्रती हाती लागू देत नाहीत, असाही आरोप केला. बँकेच्या दोन कर्मचारी युनियनपैकी एका संघटनेने नोकर भरतीला औद्योगिक न्यायालयात स्थगिती मिळविल्याचे समजते. तसे असेल तर नोकर भरती कशी करता येईल, असा सवालही केला.

बँकेचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्या नादात जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले आहे. या सभासदांच्या कर्जाचे हप्ते थकले असून, थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे. भविष्यातही थकबाकी वाढणार असल्याचे ते म्हणाले. याकडे सत्ताधाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.अध्यक्ष निवडीची संगीत खुर्चीसमितीच्या नेत्यांना मनमानी कारभार करता यावा, यासाठी अध्यक्ष निवडीचा खेळ मांडला आहे. चार महिनेच अध्यक्षाला कालावधी दिला जात आहे. सध्याच्या अध्यक्षांचा तर तीन महिन्यातच राजीनामा घेतला आहे. चुकीची नोकरभरती, मनमानी कारभार, खरेदी-दुरूस्तीवर होणारा चुकीचा खर्च याला विरोध म्हणूनच विद्यमान अध्यक्षांनी घाईगडबडीत राजीनामा दिला आहे. २० वर्षे सत्तेची स्वप्ने पाहणाºयांची पायाखालची वाळू सरकू लागल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Teacherशिक्षकSangliसांगली