सांगली : कृष्णा नदीच्या पुरात पोहण्याचा उत्साह सोमवारी एका तरुणाच्या अंगलट आला. नदीपात्रात पाण्याचा वेग अधिक असल्याने तो किनाऱ्यावर पोहोचला नाही. नदीपात्रात गस्त घालणाऱ्या सांगलीवाडीच्या रॉयल बोट क्लबच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेत या तरुणाचे प्राण वाचविले.सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वहात आहे. नदीपात्रात पाण्याचा वेगही अधिक आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बायपास रस्त्यावरील पुलावरून दत्तनगर येथील एका तरुणाने नदीत उडी घेतली. पट्टीचा पोहणारा असणाºया तरुणाने सुरूवातीला पाण्याच्या वेगासोबत किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पण थोड्याच वेळात त्याला दम लागला. पाण्यासोबत तो स्वामी समर्थ घाटापर्यंत वाहत गेला. हा तरुण पाण्यात बुडू लागला होता.याचवेळी रॉयल बोट क्लबचे सदस्य प्रतिक जामदार, प्रसाद जामदार, ओंकार जाधव, अमोल खोत, सार्थक पाटील हे नदीपात्रात घस्त घालत होते. त्यांना तरुण बुडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बोट तरुणाच्या दिशेने नेली. त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
सांगलीत कृष्णा नदीत बुडणाऱ्या तरुणाला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 8:23 PM
कृष्णा नदीच्या पुरात पोहण्याचा उत्साह सोमवारी एका तरुणाच्या अंगलट आला. नदीपात्रात पाण्याचा वेग अधिक असल्याने तो किनाऱ्यावर पोहोचला नाही. नदीपात्रात गस्त घालणाऱ्या सांगलीवाडीच्या रॉयल बोट क्लबच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेत या तरुणाचे प्राण वाचविले.
ठळक मुद्देसांगलीत कृष्णा नदीत बुडणाऱ्या तरुणाला वाचविले सांगलीवाडीच्या रॉयल बोट क्लबचे सदस्य धावले मदतीला