सचिन लाडसांगली : घरच्यांनी झिडकारल्याने सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात गेल्या दोन महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ह्यत्याह्ण ७० वर्षीय वृद्धेची कुपवाड येथील माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या वृद्धाश्रमाने जबाबदारी स्वीकारली आहे.
प्रा. पाटील यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन या वृद्धेची भेट घेतली. तिला वृद्धाश्रमात येण्यासाठी मनधरणी केली. पण वृद्धेने नकार देऊन मी इथेच राहणार, असे सांगितले.रुग्णालयासमोरील बागेजवळ दोन महिन्यांपासून वृद्धा बसून आहे. ती कोकणातील राजापूर येथील आहे. तिला रेल्वेतून इथे आणून सोडल्याचे ती स्वत: सांगते. रुग्णालय प्रशासनाने तिची चौकशीही केली नाही. याबद्दलचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली.
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनीही हे वृत्त वाचून ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून वृद्धेला आमच्या वृद्धाश्रमात दाखल करून घेणार असल्याचे सांगून माणुसकीचे दर्शन घडविले. प्रा. पाटील यांनी दुपारी रुग्णालय परिसरात जाऊन वृद्धेची आपुलकीने चौकशी केली. यावेळी रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते संजय खाडे उपस्थित होते.
प्रा. पाटील यांनी वृद्धेला वृद्धाश्रमात येण्याची विनंती केली. कपडे दिले जातील, जेवणाची सोय केली जाईल, तसेच औषधोपचारही केले जातील, असे सांगितले. पण मानसिक संतुलन बिघडलेल्या वृद्धेस ही बाब समजून आली नाही. तिने वृद्धाश्रमात येण्यास नकार दिला. मी इथेच आणखी महिनाभर राहणार आहे. माझी मुले येतील, आमचे शेत आहे, असे सांगून ती पुन्हा बागेजवळ जाऊन बसली.पोलिसांत तक्रारसामाजिक कार्यकर्ते संजय खाडे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने वृद्धेची वारंवार चौकशी केली आहे. तिला वृद्धाश्रमात दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण ती जाण्यास तयार नाही. ती राजापूरची आहे का नाही, याची चौकशी केली जात आहे. यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस चौकशीत तिच्या घरचा पत्ता समजला तर, आम्ही तिला सोडण्यास जाणार आहे.इन्साफफौंडेशनची धावसांगलीतील इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर म्हणाले, वृद्धेची आम्ही चौकशी केली आहे. तिचे पुनर्वसन करण्यास आम्ही तयार आहोत. तिला प्रा. शरद पाटील यांच्या वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी काही दिवस दररोज रुग्णालयात जाऊन वृद्धेशी संवाद साधून ओळख निर्माण केली जाईल. त्यानंतर तिला दाखल करू.