शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगली : शामरावनगरमधील नागरिकांचे आंदोलन, पावसामुळे रस्ते चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:14 PM

सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले.

ठळक मुद्देशामरावनगरमधील नागरिकांचे आंदोलन पावसामुळे रस्ते चिखलात

सांगली : शहरातील शामरावनगर परिसर, त्रिमूर्ती कॉलनी, रामकृष्ण सोसायटी, विनायक नगर, अप्पासाहेब पाटीलनगर, गादी कारखाना, रामनगर, रुक्मिणीनागर परिसरातील बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले.येत्या दोन दिवसात या परिसरातील रस्त्यावर मुरूम टाकण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. शामरावनगरमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ड्रेनेजसाठी चरी खोदल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे काही दिवसापूर्वी शामरावनगर परिसरातील नागरिकांनी सोयी सुविधासाठी आंदोलन केले होते.

तातडीने नागरी सुविधा न दिल्यास महापालिकेच्या दारासमोर संसार थाटण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी मुरमीकरण करून देण्यावे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही.बुधवारी सायंकळी सांगली शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शामरावनगरमधील सर्वच रस्ते चिखलात रुतले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणेही अडचणीचे झाले आहे . त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिकेकडे धाव घेतली.

महापालिकेच्या दारातच चूल पेटवून संसार थाटला. येत्या ८ दिवसात निर्णय न झाल्यास आयुक्त बंगल्यावर सजीव संसार नागरिकांचा थाटण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी येत्या दोन दिवसात मुरमीकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. आंदोलनाचे नेतृत्व अमर पडळकर व वैशाली अमर पडळकर यांनी केले.या आंदोलनास मनसे माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक राजू गवळी, स्वाती शिंदे, असिफ बावा, शहाजी भोसले, शैलेश पवार, आश्रफ वांकर, सलिम पन्हाळकर, उत्तम मोहिते, सुरज चोपडे, आदित्य पटवर्धन, प्रियानंद कांबळे,रोहित घुबडे पाटील, चेतन भोसले, सुधाकर पाटील,  संदीप दळवी, रज्जाक नाईक या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीroad safetyरस्ते सुरक्षा