शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

सांगली :  ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:59 PM

ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

ठळक मुद्देग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन सातवा वेतन लागू करण्याची मागणी

सांगली : ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.केंद्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शहरी डाक कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळाला. मात्र ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा लाभ दिलेला नाही.

कमलेश चंद्र समितीने सातव्या वेतन आयोगाबाबतचा जो अहवाल सरकारकडे सादर केला आहे, तो अर्थमंत्रालयामधून मंजूर होऊन मंत्रिमंडळ समितीकडे मंजुरीस पाठविण्यात आला आहे. तरीही गेल्या अडीच वर्षापासून सातवा वेतन आयोग ग्रामीण सेवकांना मिळालेला नाही. तो लवकरात लवकर मिळावा, या मागणीसाठी संयुक्त कृती समितीमार्फत २२ मेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. संप आजअखेर सुरूच आहे.मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन कायम ठेवून तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे. मोर्चे, निदर्शने, ठिय्या अशाप्रकारची आंदोलने करून त्यांनी पोस्ट प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची दखल घेऊन दोनवेळा शासनाशी चर्चाही करण्यात आली, पण निर्णय अद्याप झालेला नाही.

यापूर्वीही ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांनी तीनवेळा याच प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यावेळी काही दिवसांची मुदत मागून शासनाने आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आता पुन्हा निर्णय घेण्यासाठी मुदतीची मागणी होत असली तरी, ती ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांना मान्य नाही. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन न थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.जिल्ह्यात ६६0 कर्मचारी संपावरआंदोलनात संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पुजारी, सचिव विठ्ठल पाटील, अध्यक्ष बी. टी. यादव, प्रकाश जाधव, अजिज मुजावर, राजेंद्र देसाई, सुभाष बोडरे, अर्जुन पाटील, मुनीर मकानदार, मोहन मोरे, जयसिंग साळुंखे, दशरथ गुरव, सत्यानंद पवार, सागर दाबाडे, स्मिता खोत, गजानन टिंगरे, साधना भोसले, हसीना मुल्ला या प्रमुख पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील ६६0 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.ग्रामीण व्यवहार ठप्पग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोस्टाच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. लोकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा निघण्याची गरज आहे.

टॅग्स :Postal Groundपोस्टल ग्राऊंडSangliसांगली