शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सांगली : मांगलेतील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची जप्त करा, न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:24 PM

मांगले (ता. शिराळा) येथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमांगलेतील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची जप्त करा, न्यायालयाचे आदेश : ​​​​​​​चार कर्मचाऱ्यांच्या साडेचार लाख थकीत पगार प्रकरणी कारवाई

सांगली : मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीकडे पाच कर्मचाऱ्यांचे चार लाख ५० हजार रुपये थकीत आहेत. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने थकीत रक्कम देण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे तेथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पास बुक आणि संगणक जप्त करुन कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.मांगले ग्रामपंचायतीकडील शिवाजी रामचंद्र मोरे, आनंदा बापू कांबळे, संतोष श्रीपती तडाखे, संदीप विष्णू तडाखे या चार कर्मचाऱ्यांची चार लाख ५० हजार रुपयांची थकीत देणी ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिली नव्हती. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी सांगलीच्या कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती.

कामगार आयुक्तांनी कामगार आणि ग्रामपंचायतीची बाजू जाणून घेऊन कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्याचा निकाल दिला होता. तरीही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंचांनी कर्मचाऱ्यांची थकीत देणी दिली नाहीत. म्हणून पुन्हा कामगारांनी ग्रामपंचायतीच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक संलग्न)चे जिल्हा जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. राहुल जाधव यांनी चार कामगारांची थकीत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी न्यायालयात बाजू मांडली होती. ग्रामपंचायतीकडून रक्कम दिली जात नसल्याची बाजूही न्यायालयात मांडली होती. ग्रामपंचायतींची बाजूही त्यांच्याकडील वकिलांनी मांडली.न्यायालयाने दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी कर्मचाऱ्यांची थकीत रकमेसाठी मांगलेतील सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्च्या, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बँकेची पासबुके, संगणक जप्त करण्यात यावे. त्यानंतर जप्त मालमत्तेची विक्री करुन येणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांची कायदेशीर देणी त्वरित द्यावीत, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.फंडाच्या रकमेत दोन लाखांचा अपहारमांगले ग्रामपंचायतीकडील पाच कर्मचाऱ्यांच्या पगारातून ८.३३ टक्के प्रमाणे फंडाची रक्कम कपात केली आहे. ही रक्कम जवळपास दोन लाखाहून अधिक आहे. चार वर्षांपासून कपात करुनही ती कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरलेली नसल्यामुळे त्या रकमेचा अपहारच झालेला आहे. या रकमेबाबतही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. राहुल जाधव यांनी सांगितले.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSangliसांगली