शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

सांगली : नगरसेवक मारहाणप्रकरणी भाजपच्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:56 PM

तासगावचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत असताना जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी तासगाव पोलिस ठाण्यात येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा निषेध म्हणून भाजपने बुधवारी पुकारलेल्या तासगाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देनगरसेवक बाबासाहेब पाटील यांना मारहाणभाजपच्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद

तासगाव :  तासगावचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत असताना जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी तासगाव पोलिस ठाण्यात येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा निषेध म्हणून भाजपने बुधवारी पुकारलेल्या तासगाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली होती. याची फिर्याद देण्यासाठी ते तासगाव पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांची फिर्याद दाखल करुन घेतली जात असताना सांगलीहून पोलिस अधिक्षक शर्मा आले व नगरसेवक बाबासाहेब पाटील कोण आहे, अशी विचारणा केली व शिवीगाळ करुन मारहाण केली.

 

यानंतर त्यांना आरोपीप्रमाणे जमिनीवर बसवले. हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस व राष्ट्रवादीने खासदारांच्याविरोधात रचलेला हा कट आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

याचवेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना मारहाण केल्याचा आरोपावरून तासगावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपा