शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

Sangli- एसटी कर्मचाऱ्याचे आत्महत्या प्रकरण: जाच अधिकाऱ्यांकडून अन् शिक्षा दोन निष्पाप चिमुकलींना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 18:05 IST

कारवाईबाबत कुटुंबीयांचा प्रश्न

नितीन पाटीलपलूस : अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पलूस एसटी आगारातील एका वाहकाने आत्महत्या केल्याने कर्मचारी वर्ग सुन्न झाला आहे. ठराविक अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार अन् त्यांच्याकडून होणारा छळ यामुळे सातत्याने लालपरी बदनाम होत आहे. छळ अधिकाऱ्यांनी केला, मात्र त्याची शिक्षा मृत दुशांत यांच्या दोन चिमुकल्या मुलींना भोगावी लागणार आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी पाहून एसटी महामंडळाचे आतातरी डोळे उघडणार की पुन्हा अशाच कहाण्या जन्माला येणार, असा अस्वस्थ सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

हजारो प्रवाशांच्या आयुष्याचे दोर ज्यांच्या हाती असतात त्या कर्मचाऱ्यांचे दोर मात्र अधिकाऱ्यांच्या हाती आहेत. ते व्यवस्थित हाताळले गेले नाहीत, तर आयुष्याचे दोर तुटू शकतात, हे कटू वास्तव या घटनेने अधोरेखित केले आहे. कधी आत्महत्या, कधी आत्महत्येचा इशारा, कधी तणावात होणारे अपघात अशा गोष्टींचे ग्रहण एसटी कर्मचाऱ्यांना लागले आहे. पलूससारख्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.कवठेमहांकाळ आगारात जावेद नगारजी या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या छळास कंटाळून आगारातच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. राज्यभरातही अशीच स्थिती असली तरी सांगली जिल्ह्यात वारंवार छळाच्या तक्रारी समोर येत असल्याने एसटीचे अंतर्गत वातावरण तणावपूर्ण बनल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत.पलूसमधील हा कर्मचारी मूळचा पुणे जिल्ह्यातील आहे. त्याच्या आत्महत्येने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कवठेमहांकाळची घटना ताजी असताना पलूस आगाराचे वाहक दुशांत गंगाराम बुळे यांच्याबाबतीतही अशीच घटना घडली.

कारवाईबाबत कुटुंबीयांचा प्रश्नतिकीट तपास अधिकारी हणमंत खरमाटे यांनी कारवाई केल्याने नैराश्यात असलेल्या दुशांत यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक अधिकारी व एक चालक सोबत होते. तेसुद्धा ही कारवाई पाहात होते. या दोघांनी सहकारी अधिकाऱ्यास चुकीची कारवाई होताना का थांबविले नाही, असा सवाल मृत दुशांत यांचे कुटुंबीय करत आहेत.

दोन मुलींचे छत्र हरपलेदुशांत यांची पत्नी वर्षा यांचे दीर्घ आजाराने वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे दुशांत यांच्यावर त्यांच्या दोन मुलींची जबाबदारी होती. मोठी मुलगी सात वर्षाची तर लहान मुलगी दोन वर्षाची आहे. आता या दोन्ही चिमुकल्या मुलींच्या डोईवरचे माता-पित्यांचे छत्र पूर्णपणे हरविले आहे. एका छळाने अवघे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

चिठ्ठीत अधिकाऱ्याने अपशब्द वापरल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांकडून केवळ एकाच अधिकाऱ्यावर कारवाई केली जात आहे. एसटीने मात्र, तिघांवर कारवाई केली. कारवाईत ही तफावत का? योग्य तपास करून इतर दोघांवर गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत भावाला न्याय द्यावा. -जालिंदर बुळे, मृताचा लहान भाऊ 

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी गेला. खरमाटे यांनी चौकशी करून कारवाई करायला हवी होती. दुशांतची मशीन तपासून मग कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांनी योग्य तपास करून बुळे कुटुंबाला न्याय द्यावा. -मनोज पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा एसटी कामगार संघटना

टॅग्स :Sangliसांगली