सांगली : किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.
सुनीताच्या दोन बहिणी व भाऊही याच कामासाठी आले आहेत. ते गावातच माळावर झोपडी बांधून राहत होते. रविवारी कामावर सुट्टी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुनीताचे पती सुभाष लालसिंग राठोड (४०) याच्या खिशातील पैशाचे पाकीट गायब होते.
याबाबत त्याने सुनीताकडे विचारणा केली. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुभाष दुपारी बारा वाजता मेहूण्याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे गेला. त्याच्या पाठोपाठ सुनीताही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. घरापासून काही अंतरावर असलेल्या संभाजी वसंत जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.
सुनीताने मुलीसह आत्महत्या केल्याचा त्याला संशय आला. तासगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत अंधार झाल्याने या चौघींचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी शोध मोहिम सुरु करण्यास पोलीस व स्थानिक ग्रामस्थ गेले. आशा व उषा या जुळ्या बहिणींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोरखंडाच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. सुनीता व ऐश्वर्याचा शोध सुरु आहे.विहिर ५० फूटसंभाजी जाधव यांची विहीर ५० फूट खोत आहे. यामध्ये सध्या केवळ दहा फूट पाणी आहे. विहिरीला पाच ते सात फुटापर्यंत बांधीव काठ आहे. पायऱ्या नसल्याने विहिरीत उतरता येत नाही. त्यामुळे या चौघींचे मृतदेह काढताना खूप अडचणी आल्या.