शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सांगली :  मौजे डिग्रजच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा, नुकसान भरपाई प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:24 PM

पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमौजे डिग्रजच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा प्रलंबित नुकसान भरपाई पाटबंधारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सांगली : पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे, मौजे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर, बाळासो यशवंत पाटील यांनी याप्रश्नी एक निवेदन तयार करून ते जलसंपदा मंत्र्यांना पाठविले आहे. फराटे यांनी सांगितले की, तोडकर यांची ८८ गुंठे आणि पाटील यांची १५ गुंठे जमिन पूरसंरक्षक भिंतीसाठी घेतली आहे. याठिकाणी भिंत उभारण्यातही आली आहे.

भूमी संपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडता शेतकऱ्यांच्या जमिनीवर पूरसंरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यासाठी शासकीय निधी खर्चही करण्यात आला.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी असंख्य वेळा पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता नामदेव करे यांना समक्ष भेटून नुकसानभरपाईची मागणी केली. या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

या जमिनींबाबतचा प्रस्ताव दोनवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांनीही नवीन भूसंपादन कायद्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते, मात्र आज अखेर हा प्रस्ताव धुळ खात पडून आहे.

याप्रश्नी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांनी आत्मदहनाची मानसिकता व्यक्त केली आहे. असा प्रकार घडल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहिल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीcollectorतहसीलदार