शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

सांगली : जत तालुक्यात प्रेमीयुगुलाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 2:51 PM

दुहेरी आत्महत्येची चर्चा; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

जत (जि.सांगली) : रामपूर (ता.जत) येथील काेळेकर वस्तीवर मंगळवारी प्रेमीयुगुलाचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळून आले. उमेश उर्फ पिंटू अशोक कोळेकर (२३, सध्या रा.सांगली) व प्रियांका बाळासाहेब कोळेकर (२५, रा.रामपूर) अशी मृतांची नावे आहेत. उमेशचा मृतदेह वस्तीजवळील ओढ्याजवळ आढळून आला, तर प्रियांकाने घरी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला, तरी दाेघांच्याही नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

रामपूर येथील कंठी रस्त्यावर कोळेकरवस्ती आहे. येथील उमेश काेळेकर सांगलीतील मार्केट यार्डात हमाली करीत हाेता. वस्तीवरील प्रियांकाशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी काही वादातून प्रियांकाने त्याच्याविराेधात बलात्काराची तक्रार दिली हाेती. यानंतर, उमेशला अटक झाली हाेती. डिसेंबरमध्ये ताे तुरुंगातून बाहेर आला हाेता. यानंतर, ताे सांगलीतच राहत हाेता. साेमवारी रात्री ताे रामपूर येथे घरी आला. यानंतर, सकाळी त्याचा मृतदेह ओढापात्रात झाेपलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाजवळ चप्पल होती, तर बाजूला कीटकनाशकाची बाटलीही होती. मात्र, कीटकनाशक प्राशन केल्यानंतर हाेणाऱ्या त्रासाची काेणतीही चिन्हे घटनास्थळी अथवा मृतदेहावर नव्हती. यामुळे त्याचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. वस्तीवरील उमेशचे भाऊ व अन्य नातेवाइकांनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.दरम्यान, उमेशविराेधात बलात्काराची तक्रार देणाऱ्या प्रियांकाने साेमवारी पुन्हा जत पाेलिस ठाण्यात त्याच्याविराेधात तक्रार दिली हाेती. मात्र, मंगळवारी सकाळी उमेशचा मृतदेह दिसून आल्याने खळबळ उडाली. सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

या दरम्यान, प्रियांकाचाही मृतदेह घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. उमेशच्या मृत्यूनंतर तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु नेमका तिचा मृत्यू कसा झाला, याची माहिती समोर येऊ शकली नाही. प्रियांकाच्या माहेरच्या नातेवाइकांनी तिच्या घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी नातेवाईक जत पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पाेलिसांनी तक्रार न घेतल्याने ते सांगलीस पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे प्रियांकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी थांबविण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली