- संतोष भिसेसांगली - ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सांगलीत धडक मारली. यावेळी पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गेटवर ठिय्या मांडला. एवढ्यात संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आगमन झाले. त्यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.
संघटनेचे पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा आदींनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्य गेटकडे आगेकूच केली. पोलिसांनी मुख्य गेटसह कारखान्यात जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. कार्यकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अडवल्यामुळे झटापट होऊन धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत व विनंती करत रोखले. तेव्हा सर्वांनी गेटसमोरच ठिय्या आंदोलन केले. काही वेळातच राजू शेट्टी आले. त्यांनीही ठिय्या आंदोलनात सहभागी होत दर मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतली.