शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

सांगलीने बारामतीकरांना शिकविला लेझीमचा ताल; शरद पवारांनी केला गौरव

By अविनाश कोळी | Published: December 26, 2023 7:11 PM

सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना ...

सांगली : अस्सल महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा प्रकार जपत त्याला कलात्मकतेचा साज चढविणाऱ्या सांगलीतील विसावा मंडळाच्या कलाकारांनी बारामतीत जाऊन शंभर मुलींना या कलेचे दान दिले. येथील भीमथडी जत्रेत याचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही सांगलीकरांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलेला दाद देत त्यांचा गौरव केला.सांगलीच्या विसावा मंडळाची लेझीम खेळात ख्याती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील रसिकांपर्यंत ते पोहचले आहेत. बारामतीकरांनाही त्यांच्या कलेचा आस्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे भीमतढी जत्रेच्या निमित्ताने सांगलीच्या विसावा मंडळाच्या कलाकारांना बारामतीला निमंत्रण देण्यात आले. शारदा विद्यामंदिराच्या शंभर मुलींना ही कला शिकविण्यासाठी सांगलीतील कलाकार गेल्या काही दिवसांपासून बारामतीत ठाण मांडून होते.लेझीमचा कर्णमधूर आवाज, उत्कृष्ट पदलालित्य अन् हलगीच्या तालावर थिरकण्याच्या कलेचे प्रशिक्षण सांगलीच्या कलाकारांनी दिले. अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला हा नृत्यप्रकार अवगत केल्यानंतर बारामतीच्या मुलींनी भीमतढी जत्रेत उपस्थित पुणेकरांची मने जिंकली. बारामतीला कलेचे दान देणाऱ्या विसावा मंडळाच्या कलाकारांचा गौरवही यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. रोहित पवारांनीही सांगलीकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.सांगलीच्या विसावा मंडळाचे संजय चव्हाण, शुभम चव्हाण, पवन चव्हाण, प्रथमेश वैद्य, सुहास चव्हाण, प्रथमेश रिसवडे आदींचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार