शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सांगलीतील शिक्षकांचा दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

By अशोक डोंबाळे | Published: February 27, 2023 4:57 PM

दोन प्रमुख मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार

अशोक डोंबाळे सांगली : माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी आणि सर्व शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आनंदराव पिसाळ, मुख्याध्यापक संघाचे अशोक जाधव, शिक्षकेतर संघटनेचे प्रवीण शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन केले. निवेदनात म्हटले की, माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. परिणाम त्यांना सेवानिवृत्तीचे जीवन जगताना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शासनाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच सर्व शाळांना पगार आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे. या प्रमुख दोन मागण्यांसाठीच दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर आम्ही बहिष्कार घालणार आहे, असा इशाराही शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीHSC / 12th Exam12वी परीक्षाTeacherशिक्षक