सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी औषधांचा पुरवठा करणाऱ्या उत्तर तांबवे (ता. कऱ्हाड) येथील औषध विक्री प्रतिनिधी सुजीत दिलीप कुंभार (वय २९) यास शनिवारी अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेतील मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले हिच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ झाली आहे. तिचा पती विजयकुमार गारगोटी (जि. कोल्हापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीस असल्याने पोलिसांनी तिथे छापा टाकून दिवसभर चौकशी केली.
गेल्या आठवड्यात बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. डॉ. रूपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले अटकेत आहेत. रूपालीचा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे फरारी आहे. हॉस्पिटलमधील छाप्यात गर्भपाताची कीटस्, इंजेक्शन व औषधांचा साठा सापडला होता. आतापर्यंत नऊ गर्भपात केल्याचे कागदोपत्री उघडकीस आले आहे. याशिवाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही केल्या आहेत. गर्भपात केलेल्या महिलांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. गर्भपातानंतर भ्रूणहत्या केली आहे. हे भ्रूण दफन केलेली सांगली व कोल्हापूर जिल्'ातील ठिकाणे सापडली. तेथे खोदकाम केले; पण अजून एकाही ठिकाणी भ्रूणांचे अवशेष सापडले नाहीत. अटकेतील चौगुले दाम्पत्याकडे औषध साठ्याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी औषधांचा पुरवठा तांबवेतील सुजीत कुंभार करीत असल्याचे सांगितले.
शनिवारी सकाळी सांगली पोलिसांचे पथक उत्तर तांबवेला रवाना झाले होते. कºहाड पोलिसांची मदत घेऊन कुंभारला ताब्यात घेतले. त्याला व रूपालीला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दुपारी दोघांनाही न्यायालयात उभे करण्यात आले होते. कुंभारला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रूपाली चौगुलेच्या कोठडीतही सहा दिवसांची वाढ केली. रविवारी डॉ. विजयकुमार चौगुले याच्या कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यालाही न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
तपासात काही डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयात काम करणाºया कर्मचाºयांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागल्याने सर्वजण गायब झाले आहेत. मात्र पोलीस त्यांच्या मागावर आहेत. येत्या एक-दोन दिवसात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
आरोग्य केंद्रात चौकशीडॉ. विजयकुमार चौगुले गारगोटी (जि. कोल्हापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीस आहे. याबद्दल चौकशी करण्यासाठी पोलीस पथक गारगोटीला रवाना झाले होते. पथकाने दिवसभर आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांकडे चौकशी केली. चौगुले ड्युटीवर येत होता का? या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. काही कर्मचाºयांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत.