शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सांगली : तासगावात दोन लाखाचे दागिने लंपास, बस स्थानकातील प्रकार, गर्दीत विट्यातील महिलेस लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:58 PM

सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ठळक मुद्दे१ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास विटा पोलिस ठाण्यात फिर्याद

विटा : सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

विटा येथील खुर्शदबी व त्यांचे पती अब्दुलअजीज मुल्ला हे गुरूवारी नातेवाईकाच्या विवाहासाठी तासगाव तालुक्यातील तुरची-ढवळी येथे गेले होते. गुरूवारी विवाह समारंभ संपल्यानंतर ते पलूस बसने तासगाव बस स्थानकात गेले. त्यावेळी सायंकाळी सांगली-विटा ही बस फलाटावर आल्यानंतर विट्याकडे येण्यासाठी ते बसमध्ये चढत होते. त्यावेळी बसच्या दरवाजात अन्य महिलांनी मोठी गर्दी केली.

या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुल्ला यांच्या पर्समधील ८१ हजार रूपये किमतीचे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ८१ हजार रूपये किमतीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ व २२ हजार रूपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ असे एकूण १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ पुढील तपास करीत आहेत.पोलिसांचा सल्ला...विटा येथे आल्यानंतर मुल्ला यांच्या लक्षात चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी गुरूवारी रात्री विटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. परंतु, पोलिसांनी त्यांना शुक्रवारी सकाळी फिर्याद देण्यास येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सौ. मुल्ला यांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा