सांगली: जिल्ह्यातील विटा , किर्लोस्करवाडी व शेटफळे वाळवा आणि परिसरातील गावांना आज सकाळी सहा वाजले पासून पावसाने झोडपून काढले आहे. जवळपास एक तास पावसाच्या सरी सुरू होत्या. याशिवाय अधूनमधून पुन्हा पुन्हा सरी चालू आहेत. वातावरण ढगाळ व कोंदट आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. गोटखिंडी त दुधगांवात पाऊन तास पाऊस सुरू आहे.
सकाळी पाऊणे आकरा ते सव्वा बारा पर्यंत दीड तास अवकाळी मुसळधार पावसाने वाळवा आणि परिसरातील गावांना झोडपून काढले. तत्पूर्वी सकाळी सहा ते सात पर्यंत एक तास पाऊस झाला आहे. ढगांच्या गडगडाटाने पाऊसाने थैमान घातले होते. वाळवा येथे चार हजार एकर क्षेत्रात द्राक्षे बागा आहेत. या पावसामुळे (काल व आजचा पाऊस ) द्राक्षे बागायतदार हबकून गेला आहे. काही बागा पक्व झाले आहेत. काही ठिकाणी सौदा विक्री चा झाला आहे. पोंगा व फ्लॉवरींग मधल्या बागात डाऊनी व फळकुजवयाची भिती आहे.
हुतात्मा व राजारामबापू साखर कारखान्याचे ऊस तोडणी व बैलगाडीवान यांची दैना उडाली आहे. रानात पाणी साठले आहे. त्यामुळे ऊस तोडी बंद करण्यात आल्या आहेत. शेतमजूर ही पावसाने कामे अर्धवट सोडून घरी परत आले. अद्याप रिपरिप चालू आहे. पुनवतला पाऊस सुरू चांदोली धरण परिसरात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले. सकाळी 11 पासून पावसाने जोर वाढवला आहे.
सोनहिरा परिसरातील ग्रामस्थांना धोक्याचा ईशारा महत्वाची सूचना -
मौजे सोनसळ, शिरसगांव, सोनकीरे, पाडळी, चिंचणी (अंबक), तसेच सोनहिरा परिसरात दि. 19/11/2018 पासून अवकाळी पाऊस पडय त असून चिंचणी (अंबक) तलावात पाणी साठा कमालीचा वाढला असून प्रकल्पातील वाढीव दोन दरवाजातून 110 से. मी. ने पाण्याचा विसर्ग चालू करणेत आलेला आहे. तरी सोनहिरा परिसरातील विशेषता प्रकल्पाच्या खालील बाजूस असणा-या गांवातील शेतकरी, नागरिक,यांनी खबरदारी घ्यावी तसेच जनावरे, लहान मुले यांची काळजी घ्यावी. असे आवाहन ताकारी उपविभाग व देशभक्त शामराव मास्तर पाणी वापर संस्थेकडून करणेत येत आहे.
शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. हवेत कमालीचा गारठा. दाट धुके व ढगाळ वातावरण. बातमी मेल केली आहे. दुधगांवात पावसाने ऊस तोङ मुजराचे हाल: दुधगांवात आवकाळी पावसाने आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावलेल्यामुळे सवोदय शरद दत् इंङिया व हुतात्म विश्वास कारखान्याच्या तोङी बंद पङल्या आहेत काही ठिकाणी ऊस भरलेली वाहने अङकून राहिली आहेत