शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Sangli: सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

By शरद जाधव | Published: August 19, 2023 12:38 AM

Sangli: वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

- शरद जाधव  सांगली - वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात होणारे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय होत असलेल्या बैलगाडी शर्यतींवरही बंदी असेल. लम्पीची लाट असल्याने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, वर्षभरानंतर जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यातच लम्पीचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १६२९ बाधित जनावरे आढळली आहेत. यातील ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०१६ जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने याची लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये यासाठी आता जनावरांचे आठवडी बाजार यापुढे भरविण्यात येणार नाहीत. अनेकठिकाणी सध्या प्रशासनाची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यतीही आयोजित करण्यात येत आहेत. यापुढे शर्यतींना बंदी असणार आहे. जनावरांची एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

लम्पीची लागण जनावरांमध्ये वाढू नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार लसीकरणासह पशूपालकांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन लाख २४ हजार ७५६ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात १०० टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यूवर्षभर लम्पीबाधित जनावरे आढळत असलीतरी त्याचे प्रमाण कमी होते. गेल्या पंधरवड्यापासून मात्र, मोठ्या संख्येने बाधित जनावरे आढळत आहेत. यात अकरा दिवसात १०१६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे तर यातील १३४ जनावरे बरी झाली आहेत. केवळ अकरा दिवसात २७ जनावरांचा मृत्यू झाला असून, सध्या ८५५ लम्पीबाधित जनावरे जिल्ह्यात आहेत. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४८८, शिराळा २८३, पलूस २५६, मिरज २३, तासगाव १३, कवठेमहांकाळ १८ तर कडेगाव तालुक्यात ११ जनावरे बाधित आहेत.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग