शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

सांगलीत महिलांना लाखोंचा गंडा

By admin | Published: December 16, 2014 10:45 PM

बोगस कर्ज : संस्थेकडून नोटिसा

सांगली : महिलांना संघटित करुन त्यांच्या नावावर सांगली जिल्हा महिला विकास को-आॅप. क्रेडिट सोसायटी या संस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार आज, मंगळवार उघडकीस आला. प्रत्यक्षात या महिलांना कर्जातील एक रुपायाही मिळालेला नाही. रुक्सार ऊर्फ परवीन राजेबक्ष मुल्ला (रा. चिंतामणीनगर, सांगली) या महिलेने फसविल्याची महिलांची तक्रार आहे. फसगत झालेल्या महिलांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे या महिलेवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शोभा सांगोलकर, सुशिला पाथरवट, कल्पना आटपाडे, कमल सरगर, अनुराधा शिंदे, सुवर्णा धनवडे यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जासूद मळा, चिंतामणीनगर, राम-रहीम कॉलनी येथील महिलांना रुक्सार मुल्ला हिने संघटित केले. ‘तुम्हाला शासकीय योजनेतून लाभ मिळवून देतो’, असे आमिष दाखवून या महिलांकडून रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र व आधार कार्डच्या झेरॉक्स घेतल्या. तसेच त्यांची छायाचित्रेही घेतली. त्यानंतर सांगली जिल्हा महिला विकास को-आॅप. क्रेडिट सोसायटी या संस्थेतून या महिलांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले.आपल्या नावावर कर्ज काढल्याची या महिलांना काहीच माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वी या महिलांना एका वकिलाने पाठविलेल्या नोटिसीवरुन त्यांना ही माहिती मिळाली. (प्रतिनिधी)चौकशीचे आदेशमहिलांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. सावंत यांनी विश्रामबाग पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.