शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

सांगली : कार्यकर्त्यांनी औकात चौकात दाखवावी - महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:10 PM

सांगली : दुसऱ्यावर टीका करीत बसण्यापेक्षा राष्टय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची औकात तपासावी. नेते आल्यावरच गर्दी करण्याचे नाटक थांबवून ...

ठळक मुद्दे सांगलीतील मेळाव्यात दिल्या समर्थक कार्यकर्त्यांना कानपिचक्या

सांगली : दुसऱ्यावर टीका करीत बसण्यापेक्षा राष्टय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची औकात तपासावी. नेते आल्यावरच गर्दी करण्याचे नाटक थांबवून खरी औकात चौकात जाऊन लोकांमध्ये मिसळून दाखवावी, अशा शब्दात पक्षाचे नेते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी त्यांच्याच समर्थक कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा मेळावा येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात गुरुवारी पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतळे, जिल्हाध्यक्ष मारुती सरगर आदी उपस्थित होते.

जानकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षाची सांगलीत औकात झीरो आहे. आतापर्यंत आरेवाडीच्या बनात फक्त समाजबांधव फिरत होते. रासपचा झेंडा घेऊन फिरणारेच आपले, अशी भूमिका कायम ठेवायला हवी. उगीच टाळ्या वाजविण्यापेक्षा पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. व्यासपीठावर गर्दी आणि खालच्या खुर्च्या रिकाम्या असे दृश्य दिसल्यानेच मी खालच्या खुर्चीवर येऊन बसलो होतो. दुसºयांवर टीका करण्याएवढे आपण या जिल्ह्यात मोठे नाही, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. बूथ मजबूत केल्याशिवाय काहीही होणार नाही. कॉँग्रेसची एकेकाळी असलेली ताकद आता का कमी झाली, याचा अभ्यासही कार्यकर्त्यांनी करावा. भाजप देशात वाढत चालली आहे, यामागे अमित शहांचा त्याग आहे. भाजपचे पोलिंग बूथवर वर्चस्व आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उगाच वल्गना करीत बसण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करावे. केवळ दांड्याला झेंडा लावला की पक्ष वाढत नसतो. त्यासाठी माणसे जोडावी लागतात. पक्ष बलाढ्य होण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी किमान दहा वर्षे मेहनत घेण्याची गरज आहे. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून काम करावे लागेल. 

गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आपल्या पक्षाला यश मिळत असताना, सांगली जिल्ह्यात पक्ष कमकुवत बनला आहे. भविष्यकाळात जिथे रिझल्ट असेल, तेथेच मी सभेला येणार. उगाच मला दाखविण्यासाठी गर्दी जमवू नका. तुमचा आत्मविश्वास मेलेला आहे, तो पुन्हा जागृत करा. पूर्ण वेळ काम करणाºयांना कोणतेही मानधन मिळणार नाही. शासकीय पद न घेता काम करणाराच पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे, हे कायम लक्षात ठेवा, असेही जानकर यांनी सांगितले.जानकरांकडून संघाचे कौतुकमहादेव जानकर यांनी भाषणात राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर कौतुकाचा वर्षाव केला. भाजपच्या देशभरातील यशामध्ये संघाचा वाटा अधिक आहे. त्यांचे शिबिर मीसुद्धा केले आहे. त्यावेळी मला ही संघटना चांगली असल्याचे तसेच नि:स्वार्थीपणे कार्यकर्त्यांचे कामही दिसून आले. कार्यकर्त्यांचा त्याग मोठा असल्यामुळेच संघ व भाजप मोठा झाला आहे.आरक्षण लोकसभा निवडणुकीपूर्वीधनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. आरक्षणाचा प्रश्न केंद्राचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, असा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्री केंद्राला पाठवतील, असा विश्वास जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे लोकसभा व विधानसभा रासप भाजपबरोबर राहून लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा