शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

सांगलीत बाप्पांचे जल्लोषी स्वागत

By admin | Published: September 06, 2016 12:36 AM

उत्सवातील उत्साहाला उधाण : अवघी नगरी झाली गणेशमय, पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...’चा शहरभर घुमणारा गजर...आणि गणेशभक्तांच्या उत्साहाला आलेले उधाण अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी घरोघरी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. पारंपरिक ढोल-ताशांचा ताल आणि त्यावर भक्तांनी धरलेला ठेका अशा जल्लोषी वातावरणात बाप्पांचे स्वागत करण्यात येत होते. दुपारपर्यंत ‘बाप्पा मोरया’च्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारनंतर सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. गणरायाच्या आगमनाची आस लागून राहिलेल्या अबालवृध्दांची प्रतीक्षा संपत अखेर सोमवारी गणरायाचे आगमन झाले. घरोघरी सकाळच्या वेळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. यासाठी मूर्ती कारागीरांकडे सकाळी सातपासूनच गर्दी होती. गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात सांगली शहरात दिवसभर मिरवणुका सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी वातावरणात गणेशोत्सवास सुरुवात केली. घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच शहरातील पुष्पराज चौकातील गणेशमूर्ती स्टॉलवर गर्दी केली होती. याबरोबरच इतर साहित्यांच्या खरेदीसाठी हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ, विश्रामबाग आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)मागणी असूनही शाडूच्या मूर्ती मिळाल्या नाहीत...गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंगांसह इतर साहित्यात झालेल्या वाढीमुळे यंदा मूर्तींच्या दरात साधारणत: पन्नास ते शंभर रुपयांनी वाढ झाली होती. घरगुती गणेशमूर्तींमध्ये लहान मूर्तींच्या किंमती १७५ ते ३०० रुपयांपर्यंत होत्या. मूर्तीच्या उंचीनुसार, आकारानुसार व त्या मूर्तीवर केलेल्या आकर्षक रंगसंगतीवर दर अवलंबून होते. वेलवेटचे धोतर असलेल्या गणेशमूर्तींना विशेष मागणी होती. मात्र, या मूर्तींचा दरही इतर मूर्तींपेक्षा जादा होता. प्लॅस्टरच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी होती. या मूर्तींचे दर २०० ते दीड हजारापर्यंत होते. विशेष म्हणजे दुपारी एकनंतर बहुतांश ठिकाणच्या शाडूच्या मूर्ती संपल्याने निराश होऊन भाविकांना प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.उत्सवाचे अनेक रंग : भाविकांना महागाईचे चटके१गणरायाच्या स्वागतासाठी दारात रेखाटलेली सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुगंध, प्रसादासाठी मोदकाची मेजवानी, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट आदी तयारी पूर्ण करण्यात आली होती. सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळांच्या उत्साहाला उधाण आले होते. २बाजारात उपलब्ध असलेले विविध स्वादातील मोदक, पाच फळे, नैवेद्याच्या खरेदीसाठीही नागरिकांनी गर्दी केली होती. आंबा मोदक पेढ्यांचे दर वाढल्याने खव्याच्या मोदकांना मागणी अधिक होती. काही कंपन्यांनी पॅकिंगमधील मोदकही उपलब्ध केले होते. ३फुलांच्या दरात सोमवारी वाढ झाली होती. १ फुटाच्या हाराची किंमत ३0 ते ५0 रुपये झाल्याने ग्राहकांना धक्का बसला. नेहमी या हाराची किंमत दहा ते पंधरा रुपये असते. फुलांचे दरही वाढले होते. त्यामुळे मोठ्या हारांचे दर दीडशे रुपयांवर गेले होते.