सांगली : आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धारणा दैनंदिन जीवनशैली बनवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे केले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे तसेच, गुरूदेव आश्रम बालगाव, पतंजली योग समिती, आयुष मंत्रालय, ब्रह्माकुमारी, विविध योगासन संघटना यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल, मिरज रोड, सांगली येथे आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकांत डॉ. चौधरी यांच्यासह महापौर संगिता खोत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, गुरूदेवाश्रमाचे स्वामी अमृतानंद, अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, पतंजली योग समितीचे शाम वैद्य, क्रीडा अधिकारी एस. जी. भास्करे, प्रशांत पवार, सीमा पाटील, आरती हळिंगे, राहुल पवार, जमीर अत्तार आदि उपस्थित होते.पतंजली योग समिती यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी योग प्रात्यक्षिके, योगांचे जीवनातील महत्त्व व उपयुक्तता याबाबत योग प्रशिक्षक श्याम वैद्य यांनी माहिती दिली. योग प्रशिक्षक मृणाल पाटील, शोभा बन्ने, स्वामी अमृतानंद, राजू बांदल, प्रीती जावळे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी शरीर शिथिलीकरणानंतर विविध योगासने कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती आदिंची प्रात्यक्षिके करण्यात आली. योगासनांमध्ये दंड स्थितीतील आसने, बैठक स्थितीतील आसने, पोटावर झोपून करावयाची आसने, पाठीवर झोपून करावयाची आसने यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधऱी यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विविध मान्यवर, क्रीडा संस्था, मंडळे, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. क्षितिजा पाटील, तसेच ब्रह्माकुमारी यांच्यातर्फे सादर करण्यात आलेली योगासने सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली.सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. माणिक वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने संकुल परिसर स्वच्छता करण्यात आली होती. पोलीस मुख्यालयाच्या वतीने वाहतूक नियंत्रण व बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने रूग्णवाहिका व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर योग साधनेला मान्यता मिळवून दिल्याने योग दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.
सांगलीत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्स्फूर्तपणे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:51 PM
आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धारणा दैनंदिन जीवनशैली बनवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देसांगलीत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्स्फूर्तपणे साजरायोगधारणेला दैनंदिन जीवनशैली बनवा : डॉ. अभिजीत चौधरी