शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

स्थायीसाठी सांगलीत फिल्ंडग

By admin | Published: August 26, 2016 12:17 AM

नेत्यांच्या गाठीभेटी : जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम यांना साकडे

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नगरसेवकांनी नेत्यांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून स्थायी समितीत वर्णी लागावी, यासाठी साकडे घातले आहे. दरम्यान, सभापतीपदही रिक्त होत असल्याने, आगामी सभापती कोण? याचीही चर्चा रंगली आहे. विद्यमान सदस्यांपैकी अनेकांनी पुन्हा सदस्यत्वासाठी फिल्डिंग लावल्याने नेत्यांची कोंडी झाली आहे. स्थायी समितीतील काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, जमीला बागवान, आशा शिंदे, तर स्वाभिमानीच्या अश्विनी खंडागळे, शांता जाधव आदी आठ सदस्य निवृत्त होत आहेत. १ तारखेच्या महासभेत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. काँग्रेसमधील उपमहापौर गटाला स्थायी समितीत प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. विद्यमान सदस्य दिलीप पाटील व शिवाजी दुर्वे यांनी, पुन्हा वर्णी लागावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. हे दोघेही सभापतीपदाचे दावेदार आहेत. गत सभापतीपदी निवडीवेळी या दोघांच्या नावांची चर्चा होती. पण ऐनवेळी संतोष पाटील यांनी बाजी मारली. काँग्रेसमधून अतहर नायकवडी, पांडुरंग भिसे, निरंजन आवटी यांचीही नावे चर्चेत आहेत. माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनीही सदस्य पदासाठी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसमधील तीन जागांचा निर्णय जयश्रीताई पाटील व पतंगराव कदम घेणार आहेत. शुक्रवारी पतंगराव कदम सांगलीत येणार आहेत. त्यांना साकडे घालण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. काँग्रेसमधीलच एका गटाकडून, विद्यमान सभापती संतोष पाटील यांनाच मुदतवाढ द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियंका बंडगर, युवराज गायकवाड, संगीता हारगे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य निवडीचे सर्वाधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी दावा केल्याने इतर सदस्यांची कोंडी झाली आहे. नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, अश्विनी खंडागळे यांनी पुन्हा फिल्ंिडग लावली आहे. (प्रतिनिधी)