संजयनगर : गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षातील पहिला दिवस...नवा उत्साह आणि नव्या संकल्पनांचा सण... याच सणाचा आनंद व्दिगणीत करणारी संगीत मैफल शनिवारी पहाटे सांगलीत झाली. ‘सुर पहाटेचे’ या कार्यक्रमाने नववर्षाचे स्वागत तर झाले शिवाय रसिकांनी संगीतमय पर्वणीही मिळाली.
गेल्या २३ वर्षांपासून सांगलीकर एकत्र येत नव्या वर्षाचे स्वागत करतात. नवे विचार, नव्या संकल्पना नवीन स्वप्नं साकार करण्याची ऊर्जा त्या निमित्ताने वर्ष प्रतिपदेच्या पहिल्या किरणांकडून घेता घेता त्या सोनऊन्हात आनंदाचा सुरेल शुभांरभ गुढीपाडव्यानिमित्ताने ‘सूर पाहटेचे’ या कार्यक्रमाने झाला. रसिकांनी टाळ्या वाजवून चांगली साथ दिली. संयोजन अरूण दांडेकर यांनी केले.
यामध्ये बासरी वादन डॉ. मनाली रानडे यांनी केले. गणेशस्तवन अभिषेक तेलंग याच्या गीताने कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. साक्षी हेब्बाळकर हिने ‘पांडूरंग नामी, इथेच टाका तंबू ’हे गीत सादर केले. ‘रवि आला रे’हे गित ओंकार कुष्ठे यांनी सादर केले. ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे गीत भक्ती सांळुखे यांनी सादर केले. ’बलसागर भारत होवो’ सह सर्व गिते कलाकारांनी सादर केली.
शुुभदा पाटणकर यांनी निवेदन केले तर आॅक्टोपॅड व ढोलक साथ अजय भोगळे ,मनाली रानडे यांनी बासरी वादन, तालवाद्य ओंकार कुष्ठे यांनी तर अतुल शहा यांनी गिटार वादन केले. यावेळी अरूण दांडेकर, महेश कराडकर, प्रकाश आपटे, मुकूंद पटवर्धन, सतीश भोरे, सुहास पावसकर, सनित कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, कविता गाडगीळ डॉ. सुहास पाटील, व्यकटेश जंबगी, अस्मिता दांडेकर, अशोक ताम्हणकर, आदी उपस्थित होते.