सांगली : टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांच्या थकीत बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज तोडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सोमवारी रस्त्यावर येत सांगलीत सोमवारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाणीपट्टीसाठी कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे भरुन तात्काळ टेंभू ताकारी योजना सुरू करण्याची मागणी केली.सांगली येथील पाटबंधारे कार्यालयावर टेंभू, ताकारी लाभक्षेत्रातील आटपाडी, सांगोला, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यावेळी डॉ. पाटणकर यांच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूस्कर, उपअभियंता लालासाहेब मोरे, जयंत गलगले आदींशी चर्चा केली. मागील काही महिने पाऊस सुरू होता. पावसामुळे पिकांना पाण्याची गरज भासली नाही. गत आठवड्यापासून पावसाची उघडीप आहे. जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. ऊसासह अन्य पिके सध्या जोमात आहेत. त्यामुळे त्यांना वेळेत पाण्याची गरज आहे. टेंभू आणि ताकारी योजनांच्या थकित बिलांमुळे महावितरणने योजनांची वीज जोडणी तोडली आहे. सध्या अवर्षणग्रस्त लाभक्षेत्रातील पिकांना तातडीने पाणी देणे आवश्यक आहे. लाभक्षेत्रातील कारखान्यांनी शेतकºयांचे कापून घेतलेले पैसे वसूल करून वीज जोडणी तातडीने करण्यात यावी.आगाऊ पाणीपट्टी वीजबिल १९ टक्क्यामधून भरुन घेण्याबरोबरच साखर कारखान्यांनी संबंधित सभासदांसाठी आगाऊ पैसे भरले, तर हा प्रश्न तातडीने सुटणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग, कारखाने, जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. शासनानेसुद्धा त्यांच्याकडे थकीत असलेली टंचाई निवारणाची रक्कम तातडीने दिलीच पाहिजे. यासाठी विलंब करणे म्हणजे शासनानेच राज्याचे उत्पादन घटविण्यासारखे आहे. कारण पाणी नसल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याबाबतची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.पाटबंधारे विभागाकडून सर्व ती मदत केली जाईल, शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे, असे अधिकाºयांनी सांगितले, कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.यावेळी आनंदराव पाटील, बाळासाहेब यादव, मनोहर विभूते, अनिल विभूते उपस्थित होते.कारखाने-प्रशासनाची बैठक होणारटेंभू आणि ताकारी योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मदत केली जाईल, परंतु शेतकºयांनी पैसे भरुन सहकार्य करावे, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. कारखान्यांकडून पैसे वसुलीसाठी जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासनही अधिकाºयांनी दिल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
टेंभू, ताकारीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सांगलीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:30 PM