शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

घरातील ऐवजावर डल्ला मारणारी सांगलीची नववधू पुण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 9:58 PM

सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला

ठळक मुद्देदागिने जप्त : मध्य प्रदेशला जाण्यापूर्वी रेल्वेतच पकडले

सांगली : सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला जाण्यासाठी पाटणा रेल्वेत बसलेल्या सोनमला पकडण्यात आले. तिच्याकडून सोन्याचे १२ तोळ्याचे दागिने, चांदीचे दागिने, वस्तू, मोबाईल व १२ हजारची रोकड असा साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते वसंतदादा कुस्ती केंद्राकडे जाणाऱ्या शंभरफुटी रस्त्यावरील ‘प्रणव क्लासिक’ अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. नीरव नाकरानी आई, भावासोबत राहतात. त्यांचा कुपवाड एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी नात्यातील सोनमशी प्रेमविवाह केला आहे. ती मूळची मध्य प्रदेशमधील आहे. सोनम रामप्रसाद पटेल हे तिचे माहेरकडील नाव आहे. शनिवारी सकाळी नीरव नाकरानी नेहमीप्रमाणे करखान्यात गेले. घरी त्यांची पत्नी सोनम व आई लीलाबेन कांतिलाल नाकरानी (५८) होत्या. लीलाबेन दुपारी एक वाजता जेवण करून बेडरूममध्ये झोपल्या. याची संधी साधनू सोनम कपाटातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल असा ऐवज घेऊन पळून गेली होती. सासू लीलाबेन यांना संशय येऊ नये म्हणून तिने बेडरूमला बाहेरून कडी लावून सासूला कोंडून पोबारा केला होता.

लीलाबेन व त्यांचा मुलगा नीरव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सोनमचे मोबाईल लोकेशन काढले. सातारा, वाई, शिरवळ हे लोकेशन दाखवित होते. ती पुण्यातून रेल्वेने मध्य प्रदेशला माहेरी जाईल, असा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. सोनमचे छायाचित्रही पाठविले होते. लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री मध्य प्रदेशला जाणाºया पाटणा रेल्वेतील प्रवाशांची तपासणी केली. त्यावेळी सोनम सापडली. तिच्याकडे सापडलेल्या बॅगांची झडती घेतल्यानंतर सर्व ऐवज सापडला. ती सापडल्याचे समजताच संजयनगर पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी पुण्याला रवाना झाले होते. तिला घेऊन पथक सोमवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. तिची कसून चौकशी सुरू आहे. पण ती काहीही बोलत नसल्याचे चोरीचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलावून घेतले आहे.रेकॉर्डपेक्षा जादा ऐवज सापडलासासू लीलाबेन यांनी तीस ते चाळीस वर्षांपूर्वी खरेदी केलेले हे दागिने आहेत. त्यामुळे नेमका तपशील सांगता आला नव्हता. एकूण ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगितले होते; पण प्रत्यक्षात सोनमकडे मोठ्या प्रमाणात दागिने सापडले आहेत. यामध्ये सोन्याची दोन जोड कर्णफुले, चार साखळ्या, मंगळसूत्र, अंगठी, रिंगा, नथ, चांदीच्या जोडव्या सात नग, चांदीची साखळी, गोल शिक्के, ब्रेसलेट, पैंजण सात नग, मोबाईल व १२ हजारांची रोकड असा जवळपास साडेचार लाखांचा ऐवज सापडला आहे. हा ऐवज घरातूनच चोरल्याची कबुली सोनमने दिली आहे.रिक्षाने रेल्वे स्टेशनलासासू लीलाबेन यांना कोंडून घातल्यानंतर सोनम ऐवज व काही कपडे बॅगेत भरून अपार्टमेंटमधून बाहेर पडली. ती लक्ष्मीनगर येथे आली. तेथून रिक्षाने ती सांगलीच्या रेल्वे स्थानकावर आली. पावणेपाच वाजता कोल्हापूर-गोंदिया या महाराष्टÑ एक्स्प्रेसने ती पुण्यात गेल्याचा संशय आहे. परंतु ती चौकशीला प्रतिसाद देत नसल्याने हा घटनाक्रम स्पष्ट झालेला नाही. हवालदार जे. ए. बेग तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीrailwayरेल्वेPuneपुणेCrimeगुन्हा