सांंगली : देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.साखळकर म्हणाले, ४० कोटी खर्चून शेरीनाला शुद्धीकरण योजना राबविली. पण ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. शेरीनाल्यासह शहराचे सर्व सांडपाणी सरकारी घाटापासून पुढे थेट नदीपात्रात मिसळते. महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पंचनामा करून महापालिकेला नोटीसही बजावली. तरीही महापालिकेने काहीच केले नाही. आजही लाखो लिटर सांडपाणी खुलेआम नदीत मिसळत आहे. महापालिकेने शेरीनाल्याचे सांडपाणी पुढे नदीकाठी नाल्याद्वारे उचलून नदीतच सोडले आहे. नदीत आता पाणीपातळी कमी असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे.ते म्हणाले, एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबवायचे नाटक केले जाते. गणपती विसर्जन, निर्माल्यामुळे प्रदूषण होते, म्हणून त्यासाठी उपक्रम राबविला जातो. मात्र दुसरीकडे शेरीनाल्याचे, ड्रेनेजचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी स्वच्छ होते का? नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत, मात्र पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे सुशोभिकरण मात्र जोरात सुरू आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेवर फौजदारी दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साखळकर यांनी केली.
नदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 4:25 PM
देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.
ठळक मुद्देनदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?