शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

सांगलीचे अंतिम मतदान ६५.३८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:51 PM

सांगली : नवमतदारांचा उत्साह, महिलांचे लक्षणीय मतदान आणि तुल्यबळ उमेदवारांमुळे गतवेळच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्क्यांनी वाढले आहे. मतदानाची ...

सांगली : नवमतदारांचा उत्साह, महिलांचे लक्षणीय मतदान आणि तुल्यबळ उमेदवारांमुळे गतवेळच्या तुलनेत यंदा मतदान दोन टक्क्यांनी वाढले आहे. मतदानाची एकूण टक्केवारी यंदा ६५.३८ इतकी झाली असून, पुरुषांचे मतदान ६७.३३ टक्के, तर महिलांचे ६३.३१ टक्के इतके झाले आहे.सांगली लोकसभा मतदार संघामध्ये १८ लाख ३ हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख २५ हजार ६१४ इतकी असून, महिला मतदारांची संख्या ५ लाख ५३ हजार १८३ इतकी आहे. एकूण मतदान ६५.३८ टक्के इतके झाले.निवडणूक रिंगणात यंदा १२ उमेदवार उभे होते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर या प्रमुख उमेदवारांमध्ये जोरदार चुरस दिसून आली. तुल्यबळ उमेदवारांमुळे रंगतदार बनलेल्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढला. यास प्रशासकीय स्तरावर राबविण्यात आलेल्या अभियानाचाही हातभार आहे. एकूण मतदानात नवमतदारांचा सहभाग मोठा दिसून येतो. महिला मतदारांनीही लक्षणीय मतदान केल्याचे दिसून येत आहे.गतवेळच्या निवडणुकीची तुलना करता महिलांच्या मतदानात १ टक्का, तर पुरुषांच्या मतदानात २ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. एकूण मतदानाची तुलना करता गत निवडणुकीत ६३.४७ टक्के मतदान झाले होते. यंदा ६५.३८ टक्के झाले असून १.९१ टक्के वाढ दिसून येत आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुषांच्या टक्केवारीची तुलना केली तर, जवळपास समान मतदान झाले आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात स्त्री व पुरुष यांच्या मतदानात मोठा फरक दिसून येतो. सर्वत्र स्त्रियांचे मतदान पुरुषांपेक्षा कमी दिसत आहे.तृतीयपंथी मतदारांच्या मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच २३.२९ टक्के इतकी आहे. मतदारसंघात एकूण ७३ मतदार होते. यातील केवळ १७ मतदारांनी हक्क बजावला.लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदाची टक्केवारी ही पाचव्या क्रमांकाची मोठी टक्केवारी आहे. त्यामुळे यावेळी झालेले मतदान समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.आजपर्यंत झालेले मतदान (कंसात उमेदवारांची संख्या)वर्ष टक्के४१९५२ : ६०.८९ (४)४१९५७ : ६५.७८ (२)४१९६२ : ६६.०३ (४)४१९६७ : ६७.८१ (४)४१९७१ : ५८.२१ (६)४१९७७ : ५७.६० (२)४१९८० : ६४.०४ (२)४१९८४ : ६५.०५ (२)४१९८९ : ५८.६५ (५)४१९९१ : ५१.८० (८)४१९९६ : ५८.०४ (१८)४१९९८ : ५९.४७ (४)४१९९९ : ६८.४७ (४)४२००४ : ५८.४१ (६)४२००९ : ५२.१२ (१४)४२०१४ : ६३.७१ (१७)४२0१९ : ६५.३८ (१२)ठिकाण पुरुष स्त्री एकूण पुरुष पुरुष स्त्री स्त्री एकूण टक्केवारीटक्केवारी टक्केवारीमिरज १६६४४३ १५७७१९ ३२४१७८ ११२५८0 ६७.६४ ९६४३६ ६१.१४ २0९0१८ ६४.४८सांगली १६३२0६ १५७५५१ ३२0७९0 १०७३२२ ६५.७६ ९४८२५ ६0.१९ २0२१५८ ६३.0२पलूस-कडेगाव १३९0४४ १३६१९८ २७५२४७ ९७३९३ ७0.0४ ८९0१0 ६५.३५ १८६४0४ ६७.७२खानापूर १६६१२0 १५४९८0 ३२११0७ १0७७५२ ६४.८६ ९९३0६ ६४.0८ २0७0६१ ६४.४८तासगाव-क.महां १५0५४१ १४१५९७ २९२१४४ १0८४४६ ७२.0४ ९५६११ ६७.५२ २0४0५७ ६९.८५जत १४३८८२ १२५७00 २६९५८८ ९२१२१ ६४.0३ ७७९९५ ६२.0५ १४२९४९ ६३.१०एकूण ९२९२३६ ८७३७४५ १८0३0५४ ६२५६१४ ६७.३३ ५५३१८३ ६३.३१ ११७८८१४ ६५.३८