शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अटल सेतूवरील पहिल्या प्रवासाचे मानकरी ठरले सांगलीचे मदन पवार कुटुंबीय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 4:51 PM

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनपेक्षित स्वागताने भारावला पवार परिवार

इस्लामपूर (सांगली) : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वाधिक लांब अशा २२ किलोमीटर अंतराच्या अटल सागरी सेतूचे देशाला लोकार्पण झाल्यानंतर या पुलावरून पहिले प्रवासी ठरण्याचा बहुमान पेठ नाका (जि. सांगली) येथील निवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार आणि त्यांच्या परिवाराला मिळाला. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पवार कुटुंबाचे अगत्यपूर्ण स्वागत आणि सत्कार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अटल सेतूचे उद्घाटन केले. त्यानंतर शनिवारी १३ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून हा पूल जनतेसाठी खुला झाला. याचवेळी मदन पवार हे त्यांची पत्नी आणि ऑस्ट्रेलियावरून आलेल्या मुलीसमवेत मुंबईला निघाले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पवार यांना गाडी थांबवून खाली उतरण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार पाहून पवार कुटुंबीय क्षणभर गोंधळले.

पवार यांच्या गाडीसमोर नारळ फोडण्यात आला. तसेच त्यांना भलामोठा बुके, चॉकलेट व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या पुलावरून मुंबई शहरात जाणारे पहिले प्रवासी अशी ऐतिहासिक नोंद करणारी गव्हाण टोल प्लाझा येथील टोल पावती घेऊन मदन पवार यांनी कुटुंबासह २२ किलोमीटर लांबीच्या अटल सागरी सेतूवरील प्रवासाचा आनंद लुटला.पवार यांची मुलगी रिचा ऑस्ट्रेलियामध्ये शिकते. तेथे सिडनी-हार्बर हा जगप्रसिद्ध पूल आहे. त्यापेक्षा अधिक चांगला पूल भारतात असल्याचे सांगत मदन पवार यांनी रिचाला या पुलाचे दर्शन घडवून सिद्ध केले. प्रकल्प व्यवस्थापक कैलास गणात्रा, अभियंता अमित पाठक यांनी पवार कुटुंबाचे स्वागत करून त्यांना या पहिल्या ऐतिहासिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर