शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

सांगलीत रविवारी पत्रकारांचा मूक मोर्चा

By admin | Published: September 30, 2016 12:55 AM

पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी : हल्ल्यांविरोधात आंदोलन

सांगली : राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्याचबरोबर अनेक पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा व हल्लेखोरांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रविवार, दि. २ आॅक्टोबरला गांधी जयंतीस सांगलीत पत्रकारांच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा, या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्व पत्रकारांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्यावतीने २ आॅक्टोबरला मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे संपादक, आवृत्तीप्रमुख, ज्येष्ठ पत्रकार, ग्रामीण पत्रकार, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार आणि सर्वच पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी बारा वाजता येथील काँग्रेस भवनजवळच्या शासकीय विश्रामधाम येथून मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. पुढे स्टेशन चौकात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. त्यानंतर गांधी जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सर्व पत्रकार सहभागी होणार आहेत. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)