सांगली : टेम्पो आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्यावरील सांगलीवाडीतील कदमवाडी फाट्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.जखमीमध्ये शुभांगी भारत हसबे (वय २१, गोमटेशनगर, कुपवाड), शीतल सचिन कोळी (३०, आष्टा, ता. वाळवा), संगीता शरद कांबळे (४०, जयसिंगपूर, ता. शिरोळ), रामचंद्र ज्ञानू गुरव (४३, कारंदवाडी, ता. वाळवा), संगीता पिराप्पा तलवार (३६, सांगली), गजेंद्र कानाप्पा पुजारी (५७, कर्नाटक), पांडुरंग शंकर माळी (७५, कवलापूर, ता. मिरज), अमिता ईलाही शिकलगार (६०), प्रियांका पंडित खोत (सांगली), संपत वसंत रेडेकर (५०, येलूर, ता.वाळवा), जयश्री सिद्धार्थ लोंढे (४०), सिद्धार्थ राजाराम लोंढे (४२, गावभाग, सांगली), रचना नानासाहेब जाधव (२१, राजनगर, सांगली), महेश बाबासाहेब गावडे (४२, मिरज) व भारत गणपती शिंदे (६५, दुधगाव, ता. मिरज) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.एसटी (क्र. एमएच १० बीएन-१३६५) सांगलीहून इस्लामपूरला निघाली होती, तर टेम्पो (क्र. एमएच १० झेड ४६९६) इस्लामपूहून सांगलीला येत होता. दुचाकीस्वार अडवा आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने केला असता टेम्पो समोरुन येणाºया एसटीवर आदळल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे शहर पोलिसांनी सांगितले.
सांगलीवाडीत अपघात; १६ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:48 PM