शरद जाधव ल्ल सांगलीअस्वस्थतेच्या वातावरणात माणसांवर वाढलेला अतिरिक्त ताण रोगांंना निमंत्रण देत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे हास्य, हे सिद्ध झाल्याने सांगली शहरातही आता विविध हास्य क्लबची स्थापना होत असून सदस्यांची संख्याही वाढत आहे. सांगलीत त्रिकोणी बाग, महावीरनगर, बालाजीनगर, उत्कर्षनगर, मिरजेत चैतन्य, पाठक वृध्दाश्रमात, तर तासगाव येथेही क्लब कार्यरत आहेत. आधुनिक जीवनशैलीचा अतिरेकी वापर करताना नाहक अपेक्षा वाढत चालल्या आहेत. त्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर पदरी पडते नैराश्य, चीडचीड, अस्वस्थता. यामुळे कमी वयात चेहऱ्यावर दिसणाऱ्या वृध्दत्वाच्या छटा, निद्रानाश, हृदयरोग यातून सुरू होणारी रोगांची मालिका माणसाला पोखरून काढत आहे. आरोग्यासाठीही फायदेशीरशास्त्रीय दृष्टिकोनातून ताण-तणाव कमी करण्यासाठी हास्य महत्त्वाचे ठरत असते. हास्यावेळी मेंदूतून ‘एन्डोफ्रिन’ नावाचे द्रव पाझरते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करत असते. त्यामुळे फुफ्फुसाची ताकदही वाढते. रोगप्रतिकारक शक्तीच नव्हे, तर सध्या तणावमुक्तीचा (स्ट्रेस मॅनेजमेंट) सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून हास्याकडे पाहिले जात आहे. हास्यांचे विविध प्रकार...एकत्र जमून केवळ मोठ्याने हसणे म्हणजे शरीराला व्यायाम नसून, हास्यामध्येही विविध प्रकार आहेत.इंजिन हास्य, कांडप हास्य, मिरची हास्य, ताक-लोणी हास्य, कौतुक हास्य, विराट हास्य, नरसिंह हास्य, कंसमामा
सांगलीत रुजतेय ‘हसा आणि आनंदी राहा’ संस्कृती
By admin | Published: January 09, 2017 10:55 PM