शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एसटी बचावच्या लढ्यात सहभागी होऊ : संग्रामसिंह देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:13 AM

साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी

ठळक मुद्दे‘साथी बिराज साळुंखे’ सभागृहाचा नामकरण सोहळा

सांगली : साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी कामगारांबरोबर रस्त्यावरील लढाई लढण्यास तयार आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी एसटी कामगारांना दिली.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने सांगलीत बांधलेल्या कामगार भवनमधील सभागृहाचे ‘साथी बिराज साळुंखे सभागृह’ असे नामकरण बुधवारी करण्यात आले. यावेळी आयोजित एसटी कामगार मेळाव्यात देशमुख बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार शरद पाटील, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, विभागीय सचिव विलास यादव, बिराज साळुंखे यांच्या पत्नी उर्मिला साळुंखे आणि दोन कन्याही उपस्थित होत्या.

देशमुख पुढे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये एसटीचे फार मोठे योगदान आहे. सावित्रीच्या लेकी शिकल्या, त्याही एसटीमुळेच हे आपणास विसरुन चालणार नाही. बिराज साळुंखे यांनी एसटी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढा दिला. या एसटीचे भविष्यातही खासगीकरण होऊ नये, यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील. प्रसंगी एसटीचे खासगीकरण रोखण्यासाठी मी पक्ष बाजूला ठेवून कामगारांबरोबर रस्त्यावर उतरेन.

शरद पाटील म्हणाले, एसटीवर खासगीकरणाचे संकट घिरट्या घालत आहे. आपला शत्रू प्रबळ असला तरी, कामगारांनी संघटितपणे लढा दिल्यास यश निश्चितच आपले आहे यात शंका नाही. एसटीचे सार्वत्रिकीकरण हे जनतेसाठी आहे, हे सर्वांनीच ध्यानात घेणे गरजेचे आहे. कामगारांनी संघटित लढा दिल्यास खासगीकरण रद्द झाल्याशिवाय राहणार नाही.

अ‍ॅड्. शिंदे म्हणाले, एसटीचे खासगीकरण करण्याचा शासनाचा डाव आहे. सामान्य जनतेने देखील कामगारांनी पुकारलेल्या लढ्यात सहभागी होणे गरजेचे आहे.यावेळी संघटनेचे एम. बी. पठाण, अशोक खोत, कॉ. विकास मगदूम, डी. पी. बनसोडे, शमू मुल्ला, सतीश मेटकरी, शकील शेख आदी उपस्थित होते. एसटी बँकेचे संचालक नारायण सूर्यवंशी यांनी स्वागत केले. एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास यादव यांनी प्रास्ताविक केले.संघटनेची शक्ती कमी करण्याचा उद्योग : ताटेएसटी महामंडळामध्ये राज्यात एक लाख कर्मचाऱ्यांची संख्या असून त्यापैकी ७० हजार कर्मचारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. एवढ्या मोठ्या संघटनेची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून चालू आहे. पण, आमची कर्मचारी संघटना कर्मचाºयांच्या हितासाठीच जन्माला आली असल्यामुळे संघटना कधीच संपणार नाही, असे हनुमंत ताटे म्हणाले. राज्यातील एसटीचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही, यासाठी आमचा लढा चालूच राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप