फोटो ओळ : सांगली जिल्हा शिक्षक संघाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय दिवे यांचा विनायक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश गुरव, अरुण पाटील, तानाजी खोत आदी उपस्थित होते.
पुनवत : सांगली जिल्हा शिक्षक संघाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या कार्याध्यक्षपदी कापरी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सागाव येथील संजय दिवे यांची निवड करण्यात आली.
यानिमित्ताने सांगली जिल्हा शिक्षक संघ व शिराळा तालुका शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, पार्लमेंट बोर्डाचे नेते अरुण पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष तानाजी खोत यांच्या हस्ते संजय दिवे यांचा सत्कार करण्यात आला.
संजय दिवे म्हणाले, शिराळा तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींना बरोबर घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी रफिक आत्तार, फत्तेसिंग पाटील, संजय पाटील, निवृत्ती साळुंखे, गणेश लोणिष्टे, कृष्णा तेरवे, मोहन पवार, इनूस मणेर, केशव पवार आदी उपस्थित होते.