लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : सांगली-मिरज एमआयडीसी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय खांबे यांची, तर उपाध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली. सचिवपदी हर्षल खरे, सहसचिवपदी मनोज पाटील यांची आणि खजिनदारपदी उद्धव दळवी यांची निवड झाली.
निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक शंकरराव तायशेट्टी होते. या निवडी पुढील दोन वर्षांसाठी आहेत. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक दीपक शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून उद्योगामध्ये जलद गतीने त्याची अंमलबजावणी केली.
ज्येष्ठ संचालक के. एस. भंडारे यांनी असोसिएशनच्या कामाचा गौरव केला. व्यवस्थापक गणेश निकम यांनी संयोजन केले. संजय आराणके, माधव कुलकर्णी, विजय भोसले, अरविंद जोशी, सी. विनयकुमार, राहुल देशपांडे, यशोधन फडके, स्नेहलता गाडगीळ, अतुल पाटील उपस्थित होते.