अशोक डोंबाळे।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली लोकसभा मतदार संघाचे खा. संजयकाका पाटील यांच्यासाठी खानापूर-आटपाडी विधानसभा, तर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी खानापूर-आटपाडी, तासगाव आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासाठी तासगाव, पलूस-कडेगाव मतदारसंघ घातक ठरणार आहेत. संजयकाकांनी आटपाडी, जत तालुक्यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.२००९ ला लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन सांगली लोकसभा मतदारसंघात प्रथमच खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला. सांगली लोकसभेत सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, खानापूर-आटपाडी, जत, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सद्य स्थितीमध्ये भाजपकडे तीन, शिवसेनेकडे एक, काँग्रेसकडे एक आणि राष्ट्रवादीकडे तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघात आमदार आहे.२००९ च्या पंचवार्षिक निवडणुकांत काँग्रेसचे प्रतीक पाटील, तर २०१४ च्या निवडणुकीत खा. संजयकाका पाटील विजयी झाले. मात्र, प्रतीक पाटील यांना सांगली, पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडी या तीनच विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत मात्र सहा विधानसभा मतदारसंघात संजयकाकांनी २० ते ४५ हजाराचे मताधिक्य घेऊन प्रतीक पाटील यांचा पराभव केला होता. प्रतीक पाटील यांना एकाही मतदारसंघात मताधिक्य मिळाले नव्हते.२०१४ च्या निवडणुकीनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फार मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकरांनी संजयकाकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. काँग्रेसने चिन्हच गोठविले असून, प्रतीक पाटील यांचे बंधू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी दुष्काळी जत, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील दादाप्रेमी गट रिचार्ज केला आहे. यामुळे संजयकाकांना एकतर्फी वाटणारी निवडणूक प्रचंड रंगतदार झाली आहे.आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसची परिस्थिती खूपच खराब असल्यामुळे येथील मताचा टक्का वाढविण्यासाठी विशाल पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत. गोपीचंद पडळकर यांनी पलूस-कडेगाव, संजयकाकांचे होमपिच असलेले तासगाव, सावळज या शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे.संजयकाका पाटील : गेल्या निवडणुकीत विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याने संजयकाका विजयी झाले. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांचा वरचष्मा आहे. त्यांनी आटपाडी, खानापूर, कडेगाववर जास्त लक्ष दिले आहे.विशाल पाटील : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील रिंगणात असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गटतट बाजूला सारून कामाला लागले आहेत. सांगली शहर त्यांचे होमग्राऊंड आहे. जत, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ तालुक्यातही त्यांचा मोठा गट आहे.गोपीचंद पडळकर : गोपीचंद पडळकरवंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आटपाडी त्यांचा स्वत:चा तालुका आहे. खानापूर, तासगाव पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यावर त्यांची भिस्त आहे. सांगली, मिरज शहरांवर यांनी भर दिला आहे.
Lok Sabha Election 2019 संजयकाकांसाठी जत, आटपाडी, तर विशालसाठी तासगाव घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:20 PM