लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे (एमटीई) सदस्य नसलेले खासदार संजयकाका पाटील सोसायटीचे स्वयंघोषित अध्यक्ष आहेत, अशी टीका सोसायटीचे सचिव श्रीराम कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, एमटीईबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वालचंद महाविद्यालय हे सोसायटीचे आहे, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती. त्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. हा तर आमचा विजय आहे. एकाच नावाच्या दोन संस्था असू शकत नाहीत. सध्या सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेच आहेत. अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी कार्यपद्धती आहे. अचानक कोणाच्याही गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकत नाही.खोडके समितीचा अहवाल शासनाने मान्यता दिल्याशिवाय खुला होऊ शकत नाही, असे असताना तो कसा काय फुटला, हा संशोधनाचा विषय आहे. विनाकारण सुरू असलेल्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच पदवीदान समारंभास आम्ही विरोध केला नाही, असेही कानिटकर यांनी सांगितले.
‘संजयकाका पाटील एमटीईचे स्वयंघोषित अध्यक्ष’
By admin | Published: May 29, 2017 4:18 AM