शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘टेंभू’च्या ३०० कोटींना मुख्यमंत्र्यांकडून सहमती--संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:26 PM

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकºयांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी ५०० ते ६०० कोटींची गरज आहे. त्यापैकी ३०० कोटींचा निधी तात्काळ देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दिली आहे

ठळक मुद्देबाजार समितीतील मक्तेदारी संपविलीत्या सहा महिन्यांत सर्व कामे मार्गी लागतील, असा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकºयांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी ५०० ते ६०० कोटींची गरज आहे. त्यापैकी ३०० कोटींचा निधी तात्काळ देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दिली आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी दिली. बाजार समितीमध्ये सोसायटी आणि सरपंचांनाच मतदानाचा हक्क देऊन ठराविक घटकांची मक्तेदारी राज्य सरकारने मोडीत काढल्याचेही त्यांनी सांगितले.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून खा. पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रशांत शेजाळ होते.

खा. पाटील म्हणाले की, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या साडेचार हजार कोटींच्या सुधारित खर्चाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या योजनेत समावेश नसल्यामुळे निधीची अडचण निर्माण झाली होती. या योजनेचेही ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्य कालव्याचे अस्तरीकरण आणि पोटकालव्याच्या कामांसाठी ५०० ते ६०० कोटींच्या निधीची गरज आहे. तो मिळविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची पंधरा दिवसांपूर्वी मंत्रालयात भेट घेतली, त्यावेळी त्यांनी तातडीने ३०० कोटी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. महिन्याभरात निधी उपलब्ध होईल.

सभापती शेजाळ म्हणाले की, शेतकºयांनी फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीतच शेतीमाल विक्रीचे व्यवहार करावेत. त्यामुळे कोणीही शेतकºयांची फसवणूक करू शकणार नाही. सर्वच शेतीमालाला जीएसटीतून सवलत मिळावी.

सचिव प्रकाश पाटील यांनी अहवाल वाचन केले. बाजार समिती कार्यक्षेत्रात १६३९ कोटींची वर्षात उलाढाल झाली आहे. १७ कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, १० कोटी २७ लाख खर्च झाले आहे. सहा कोटी ९९ लाखांचा नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. कवलापूर येथील शेतकरी आकाराम माळी यांनी, बेदाणा विक्रीनंतर शेतकºयांना तात्काळ बिल मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, जि. प. सदस्य विक्रम सावंत, अजित बनसोडे, कुमार पाटील, दादासाहेब कोळेकर, सुरेश पाटील, विकास मगदूम, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, बाळू बंडगर, अण्णासाहेब कोरे, दिनकर पाटील, उमेश पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा उपस्थित होते.बेदाणा, हळद ‘जीएसटी’मुक्त करू : पाटीलप्रशांत शेजाळ यांनी हळद, बेदाणा, मिरची, धन्यासह शेतीमालावरील जीएसटी १०० टक्के रद्द करण्याची मागणी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे केली होती. सभापतींच्या मागणीवर खा. पाटील म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन हळद, बेदाणा, मिरची शंभर टक्के जीएसटीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. 

मिरजेत दुकानगाळे बांधण्यासाठी पाच कोटीमिरज दुय्यम बाजार आवारामध्ये दुकानगाळे बांधण्यासाठी पाच कोटी आणि जत येथे डाळिंब सौद्यासाठी तीन मोठी शेड उभारण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व कामे मार्गी लागतील, असा विश्वास सभापती प्रशांत शेजाळ यांनी व्यक्त केला.