प्राचार्य पी. बी. चव्हाण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित सत्कारप्रसंगी पाटील म्हणाले की समिती किंवा पदे ही लोकसेवेची संधी आहे. त्यामुळे करदाते, कर सल्लागार यांचे प्रत्यक्ष कर म्हणजे आयकर, कॉर्पोरेशन कर, टीडीएस संबंधित प्रश्नांसाठी काम करण्याची संधी आहे. केंद्रीय जीएसटी कोल्हापूरचे संयुक्त आयुक्त राहुल गावंडे म्हणाले, या समित्यांचा हा मुख्य हेतू प्रशासकीय व प्रक्रियात्मक अडचणी दूर करणे हा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आयकर व कंपनी करदात्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम या समितीच्या माध्यमातून संजयकाका पाटील करतील.
ही समिती आयकर विभागास सल्ला देण्याचे काम करील. करदाते आणि आयकर विभाग यांच्यातील दुवा असलेल्या या समितीचा आयकर, कॉर्पोरेशन कर व टीडीएस कर भरणासंबंधीच्या प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक अडचणी दूर करणे हा मुख्य हेतू आहे.
यावेळी खासदार संजय पाटील यांच्या हस्ते सविता चव्हाण व अविनाश चव्हाण यांचा सीओटी या आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल; तर मोहन वाघ यांचा केंद्रीय जीएसटी साहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रशांत साळुंखे उपस्थित होते.
फोटो : १२ मिरज १
ओळ : प्रादेशिक प्रत्यक्ष कर सल्लागार समितीच्या सदस्यपदी नामांकन झाल्याबद्दल खासदार संजयकाका पाटील यांचा राहुल गावंडे, मोहन वाघ, राजेंद्र मेढेकर, अविनाश चव्हाण, नितीन पाटील यांनी सत्कार केला.