लोकमत न्यूज नेटवर्कताकारी : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या भंडाऱ्यानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात भारत केसरी, तेजसिंह आखाडा, चंदीगडचा पैलवान युधिष्ठीरने शाहूपुरी तालीम कोल्हापूरचा मल्ल संतोष दोरवड याला केवळ दोन मिनिटात एकछाक डावावर अस्मान दाखवून कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे, दिलीपराव मोरे, अॅड. विवेकानंद मोरे, संजय पाटील यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे इनाम देऊन युधिष्ठीरचा गौरव करण्यात आला.प्रारंभी बिजली मल्ल शामराव मोरे व वस्ताद नामदेव औताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे यांच्याहस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. या मैदानात १०० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत २०० हून अधिक कुस्ती झाल्या. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान अक्षय शिंदे जखमी झाल्याने शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल देवीदास घोडके याला विजयी घोषित करण्यात आले. विक्रम शेटे व भोसले व्यायाम शाळेचा मल्ल प्रशांत शिंदे यांच्यात झालेली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.मैदानात विक्रम चव्हाण (कोल्हापूर), हणमंत कुरी (पुणे), अजय निकम (राजारामबापू केंद्र), विजय तुपसुंदर (खुडूस), अमोल बागाव (कोल्हापूर), राहुल सोळवंडे (कुंडल), तुषार झंजे (खुडूस), कृष्णा पवार (राजारामबापू केंद्र), राहुल पाटील (सुरुल), पृथ्वीराज पवार (सांगली), प्रशांत जगताप (इचलकरंजी), श्रीराज पाटील (तुपारी), नियंत शिंदे (बोरगाव), संदीप जाधव (तांबवे), उमेश मदने (दुधोंडी ), जोतिराम पाटील (बोरगाव), शुभम सांडगे (रेठरेधरण), गणेश येसुगडे (पलूस) यांनी प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवला.स्थानिक मल्ल प्रसाद बिरमुळे, विनोंद नांगरे, अभिजित बेंदुगडे, सुजित कोळेकर, विनायक माने, विक्रांत पवार, संग्राम शिंदे, रोहित पाटोळे, मुस्तफा मुल्ला, रोहित मोरे, सुजय मोरे, जोएफ आंबेकरी, निहाल मुल्ला, शुभम पाटोळे, जावेद आंबेकरी यांनी चटकदार कुस्त्या केल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच जे. डी. मोरे, उपसरपंच सुभाष शिंदे, दामाजी मोरे, उमेश पवार, सुजित मोरे, संदीप जाधव, जे. व्ही. मोरे, डी. के. मोरे, प्रतापराव मोरे, सुरेश पवार, पतंगराव मोरे, जयवंत मोरे, पोलिस पाटील सुखदेव वाकळे, यशवंत सावंत, सर्जेराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.पंच म्हणून अनिल बाबर, शिवाजी गोंदील, गणेश खराडे, विनायक पाटील, विजय पाटील, गुलाब पाटील, शिवाजी कोळेकर, विलास शिंदे, विकास पाटील, नेताजी मोरे यांनी काम पाहिले.
युधिष्ठीरकडून संतोष दोरवड एकछाकने चितपट
By admin | Published: May 12, 2017 11:10 PM